शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम पार्कच्या जागेला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: January 28, 2015 23:07 IST

अकोली रेल्वे स्थानक पसिरात खुल्या जागेवर अतिक्रमण सुरु आहे. काही महाभागांनी परस्पर भूखंडाची विक्री करण्याचा धंदा सुरु केला असून यात सामान्यांची फसवणूक होत आहे.

अमरावती : अकोली रेल्वे स्थानक पसिरात खुल्या जागेवर अतिक्रमण सुरु आहे. काही महाभागांनी परस्पर भूखंडाची विक्री करण्याचा धंदा सुरु केला असून यात सामान्यांची फसवणूक होत आहे. मोक्याची जागा अतिक्रमणाने वेढली जात असताना महापालिका प्रशासन यापासून अनभिज्ञ आहे.अकोली रेल्वे स्थानकाच्या अगदी समोरील भागात महापालिका, रेशीम उद्योग आणि महसूल विभागाची खुली जागा आहे. हाकेच्या अंतरावर रेल्वे स्थानक तर काही अंतरावर अकोली गाव, म्हाडा कॉलनी वसलेली आहे. मात्र काही जणांची या खुल्या जागेवर वक्रदृष्टी पडली. मनात येईल त्यानुसार जागा ताब्यात घेण्याचा प्रकार येथे सुरु आहे. कापडी दोऱ्या बांधून जागा ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू आहेत. ज्या जागेवर अतिक्रमण केले जात आहे त्या भागात ८०० ते हजार रुपये दराने भूखंडाचे भाव आहे. त्यामुळे या खुल्या जागेला अनेकांनी लक्ष्य केले आहे. जागा घेरण्यासाठी येथे स्पर्धा लागली आहे. जागा ताब्यात घेण्यासाठी महिला, पुरुषांची होत असलेली गर्दी जणू येथे यात्रा भरल्याचे चित्र आहे. मागील आठ दिवसांपासून जागा घेरण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. अमरावतीच्या बाहेरील व्यक्ती सुद्धा जागा घेरण्यासाठी अकोली रेल्वे स्थानक परिसरात येत असल्याचे दिसून आले आहे. ही खुली जागा कोणी घेरण्याचे सांगितले असे काही अतिक्रमण घेरणाऱ्यांना विचारले असता घर नाही म्हणून घेरत असल्याचे उत्तर मिळाले. तर काहींनी एका आमदाराचे नाव सांगितले. ही खुली जागा रेशीम उद्योगासाठी राखीव आहे. यापैकी काही जागा महापालिकेच्या मोकाट कुत्र्यांची नसबंदी दवाखाना, आरोग्य विभागासाठी राखीव आहे. महापालिका नियंत्रणात असलेली खुली जागा अतिक्रमणात गेली तर भविष्यात नागरिकांच्या वापरासाढी जागा कोठून आणाव्यात, असा सवाल आहे. खुल्या जागा ताब्यात घेवून ती विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. यापूर्वीसुद्धा खुल्या जागेवर अतिक्रमण करुन शहरातील मोक्याच्या जागा महापालिकेला गमवाव्या लागल्या आहेत. एकिकडे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु असताना अकोली रेल्वे स्थानक परिसरातील हे अतिक्रमण कधी हटविले जाणार, याकडे लक्ष लागले आहे. आयुक्तांनी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांना घटनास्थळी भेट देऊन अतिक्रमण हटविण्याबाबचे आदेश दिले आहेत.