शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कर्मचारी दोषी, अधिकारी निर्दोष कसे?

By admin | Updated: June 18, 2014 23:50 IST

घरफोड्यांचे सत्र थांबविण्यात अमरावती शहर पोलीस दलाला सपशेल अपशय आले असताना, सुरक्षा प्रदान करू न शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही.

दुजाभाव : ३६ शिपायांवर कारवाई, वरिष्ठांना सारेच माफगणेश देशमुख - अमरावतीघरफोड्यांचे सत्र थांबविण्यात अमरावती शहर पोलीस दलाला सपशेल अपशय आले असताना, सुरक्षा प्रदान करू न शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही. आंधळ्यांनाही दिसावा असा कसूर अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात असतानाही पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी का घालतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील सामान्य नागरिक कमालीचा भयभीत आहे. एप्रिल महिन्यात २७, मे महिन्यात २५, जून महिन्यात १६ चोऱ्या-घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत चोरीचे ३३६ अािण घरफोडीचे ११९ गुन्हे घडले आहेत. अनेक वस्त्यांमध्ये चोर दिसतात. सतर्क नागरिकांमुळे त्यांना पोबारा ठोकावा लागतो. चोर कधीही येईल, या धास्तीमुळे सामान्य नागरिक कायम दहशतीत आहे. घराला मजबूत कडीकोंडे लावणे, लोखंडी दरवाजे लावणे, ग्रील, चॅनेलगेट लावणे असले उपाय करून सामान्यजनांनी स्वत: शक्य ती उपाययोजनी करवून घेतली. बाहेरगावी जाण्याचा बेत अनेकांनी रद्द केला; तथापि चोऱ्या थांबतच नाहीत म्हटल्यावर रात्री नागरिकांचा डोळा लागणार तरी कसा? एक-दोन नव्हे, चोऱ्यांचे सत्र लागोपाठ सुरू आहे. दोन हजार पोलिसांच्या फौजेचा प्रमुख असलेल्या पोलीस आयुक्तांना, अधिनस्थ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मान खाली घालावी लागत आहे. तरीही सुरेशकुमार मेकला यांनी एकाही अधिकाऱ्यावर कठोर कारवाई का करू नये, हा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. गुन्हे शाखेच्या १९ आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या १७ कर्मचाऱ्यांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला. कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी हजार आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड या कारवाईअंतर्गत वसूल करण्यात आला. हे कर्मचारी अकार्यक्षम असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. आमचा सवाल त्याही पुढचा आहे. प्रत्येक ठाण्याचा प्रमुख हा ठाणेदार असतो. ठाणेदार योग्यरीत्या कर्तव्य बजावतात की नाही याचे निरीक्षण करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त अर्थात एसीपींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एसीपी आणि पोलीस ठाणी योग्यरीत्या कर्तव्य बजावतात की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शहरात १० ठाणी आहेत. एसीपींची पाच कार्यालये आहेत. त्यापैकी चार कार्यरत आहेत. तीन डीसीपी आहेत.