शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

वाहन, पशुधन चोरांच्या मुसक्या आवळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST

गावोगावी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, बच्चू कडू यांचे निर्देश परतवाडा : अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांत दिवसेंदिवस पशुधन व ...

गावोगावी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, बच्चू कडू यांचे निर्देश

परतवाडा : अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांत दिवसेंदिवस पशुधन व वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा फटका शेतकरी व ग्रामीण जनतेला बसत आहे. याशिवाय दोन्ही शहरे व ग्रामीण भागात अवैध दारू, गुटखा विक्रीला उधाण आले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन अटकाव करण्याचे आदेश अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

बुधवारी परतवाडा येथील शासकीय विश्राम भवनात उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांतील ठाणेदारांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर घटनांना अटकाव घालण्याकरिता विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने आता प्रत्येक लहान व मोठ्या गावांत मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तथा नाईट व्हिजन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे पशुधन व वाहनचोरांवर प्रशासनाची २४ तास करडी नजर राहील. त्यातूनच इतर घटनांना अटकाव होईल, असे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले. बैठकीला अचलपूरचे एसडीपीओ पोपटराव अब्दागिरे, परतवाड्याचे ठाणेदार सदानंद मानकर, सरमसपुराचे ठाणेदार जमील शेख. आसेगाव पूर्णाचे ठाणेदार किशोर तावडे, पथ्रोटचे ठाणेदार जाधव, शिरजगावचे ठाणेदार पंकज दाभाडे, चांदूर बाजारचे सुनील किनगे, ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार दीपक वळवी, अचलपूर प्रभारी ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे उपस्थित होते.

बॉक्स

दारूमुळे उद्ध्वस्त कुटुंबांचे पुनर्वसन

तालुक्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यसनाधीन कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण (पुणे) व ना. बच्चू कडू यांच्या संयुक्त विद्यमाने कुरळपूर्णा येथे दोन महिन्यांचे विशेष व्यसन मुक्ती शिबिर होईल. कुटुंबातील होतकरू स्त्रिया व महत्त्वाकांक्षी मुलांकरिता व्यवसाय तथा शिक्षणाकरिता विविध पूरक योजना पोलीस व राज्यमंत्र्यांच्या विद्यमाने उपलब्ध केल्या जातील.

बॉक्स

राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात कळवावी चोरांची नावे

पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावातील चोर, अवैध दारू विक्रेते व त्यांना मदत करणाऱ्यांची नावे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयात व स्थानिक पोलीस ठाण्यात कळवावी. त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.