शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाच्या नावे २ कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 02:28 IST

‘ट्रायबल’मध्ये घोटाळा; अधिकारी, कर्मचारी गोत्यात येण्याची चिन्हे

- गणेश वासनिक अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या सातपैकी पाच प्रकल्पांत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या नावे १ कोटी ९५ लाख, ८२ हजार १३३ रुपयांचा अपहार झाला असून दोन दिवसांत संबंधित संस्थेविरूद्ध तक्रार दाखल करण्यात येणार आहे.औरंगाबाद येथील श्रीमंत महाराज महादेवराव सिंधीयाजी फाऊंडेशन, जाणता राजा चॅरिटेबल ट्रस्ट आणि परभणी जिल्ह्यातील लोहारा येथील क्रांतिज्योती प्रमिलाजी चव्हाण महिला मंडळ या संस्थेने आदिवासी युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणात सन २०१२ ते २०१६ या कालावधीत अपहार केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.नाशिक येथील आयुक्त, तसेच अमरावतीचे अपर आयुक्त यांनी फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना अगोदरच प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केल्या आहेत. मात्र, औरंगाबाद व किनवट येथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी अपहाराचे प्रकरण पोलिसांत देण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते.धारणी येथील सहायक प्रकल्प अधिकारी किशोर पटेल, पुसद येथील आदिवासी विकास निरीक्षक ए. एस. इंगळे, तर कळमनुरी प्रकल्पातील वरिष्ठ लिपीक के. बी. भोरपे यांची नियुक्ती प्राधिकृत अधिकारी म्हणून केली असून फौजदारी दाखल करण्यासाठी यांना पुढाकार घ्यावा लागेल.कौशल्य विकास आयुक्तांचे पत्रही बनावटआदिवासी युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण ही योजना कागदोपत्री राबविली. मात्र, प्रशिक्षणाथींंना दिलेले प्रमाणपत्रही बनावट होते, हे चौकशीतून समोर आले आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि त्यावरील स्वाक्षरी बोगस असल्याचे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आयुक्तांनी सांगितले. प्रशिक्षण प्रमाणपत्राचा अवधी ३ डिसेंबर १९३१ असे दर्शविण्यात आले आहे. ब्रिटिशपूर्व काळ यात नमूद आहे. इतकेच नव्हे तर भारताची राजमुद्रेचा वापर प्रमाणपत्रावर केल्याचे स्पष्ट झाले.