शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

तारेच्या स्पर्शाने घरात विद्युत प्रवाह

By admin | Updated: June 7, 2014 23:42 IST

वादळी वार्‍यामुळे विद्युत तारेचा स्पर्श घराला झाल्याने तीन जण जखमी झाले. तसेच घरातील सर्व विद्युत उपकरणे जळाली. शुक्रवारी सायंकाळी नागपुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या सहारानगरात ही घटना घडली.

सहारानगरातील घटना : तीन जण जखमी, विद्युत उपकरणे जळालीअमरावती : वादळी वार्‍यामुळे विद्युत तारेचा स्पर्श घराला झाल्याने तीन जण जखमी झाले. तसेच घरातील सर्व विद्युत उपकरणे जळाली. शुक्रवारी सायंकाळी नागपुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या सहारानगरात ही घटना घडली. फरजाना परवीन अब्दुल कदीर (५५) ,रुखसाना परवीन शेख कासम (५५) व नुरसबा अब्दुल कदीर (१५) असे जखमीचे नावे आहे. सहारानगरात  युसुफ पिंजानी यांच्या घरात पाच ते सहा कुटुंबीय भाड्याने राहत आहेत. अब्दुल कदीर यांचेही कुटुंब तेथे राहत आहेत. पिंजाणी यांच्या घरावरुन  विद्युत तारेची ३२ केव्हीची लाईन  गेली आहे. शुक्रवारी पिंजाणी कुटुंबीय लग्न समारंभाकरिता बाहेर गेले होते.  दरम्यान सायंकाळी वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे त्यांच्या घरावरील विद्युत तार तुटून लोखंडी ग्रीलमध्ये अडली. त्यामुळे घरात विद्युत प्रवाह संचारला. यावेळी घरात असलेले भाडेकरु नुरसबा अब्दुल कदीर, फरजाना परवीन अब्दुल कदीर व पाहुणे म्हणून आलेली रुखसाना यांना विद्युत प्रवाहाचा जबर धक्का बसला. यामध्ये तिघीही जखमी झाल्या. तसेच घरातील सर्व विद्युत उपकरणे जळाली. विद्युत प्रवाहाच्या झटक्याने जखमींनी आरडाओरड    केला असता शेजारी धावून आले मात्र वादळी वारा सुरु असतानाच काही क्षणात त्या विद्युत तारा घराहुन पुन्हा बाजूला सरकल्यामुळे त्या बचावल्या. जखमींना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. नुरसबा हिचा उपचार अजूनही अद्याप सुरू आहे. अब्दुल कदीर यांच्या घरात पाच सदस्य आहेत. या घटनेची तक्रार नागपुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी जखमीचे बयाण नोंदविले आहे. (प्रतिनिधी)