शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

९३ ग्रा.पं.च्या १४७ रिक्त पदांसाठी होणार निवडणूक

By admin | Updated: June 15, 2015 00:21 IST

जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ९३ ग्रामपंचायतीच्या ...

आॅगस्ट २०१५ मध्ये संपणार मुदत : १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकाअमरावती : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ९३ ग्रामपंचायतीच्या १४७ रिक्त पदांसाठी जुलै महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायतींच्या मतदार यादींचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार आहे. यासर्व ग्रामपंचायतींचा कालावधी आॅगस्ट महिन्यात संपणार आहे. त्यापूर्वी निवडणूक घेण्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चिखलदरा तालुक्यातील ५, धारणी १, अचलपूर १, नांदगाव खंडेश्वर ७, भातकुली १, धामणगाव रेल्वे २ व चांदूररेल्वे १ अशा १८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पोटनिवडणुकांमध्ये सोनापूर, टेभु्रसोंडा, हतरु, रुईपठार, चिचखेडा, आमझरी, रायपूर, आडनदी, कोहाणा, या ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांची निवडणूक होणार आहे. तिवसा तालुक्यात सार्सी, दापुरी खुर्द, पूर्णा, धोत्रा, अनकवाडी, कनाडगव्हाण, डेहणी, निंभोरा या ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांची निवडणूक होणार आहे. अमरावती तालुक्यामधील बोरगाव धर्माळे, कस्तुरा मोगरा, वाघोली, नांदुरा बुजरुक, इंदला, कुंडसर्जापूर ग्राम पंचायतींच्या रिक्त पदांचा समावेश आहे. चांदूररेल्वे तालुक्यात कळमजापूर, सातेफळ, पाथरगाव ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी निवडणूक होणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पिंपळगाव निपाणी, सिद्धनाथपूर, जामगाव, जनुना, खिरसाना, नांदसावंगी, भगुरा येथील रिक्त पदाची निवडणूक होणार आहे. धारणी तालुक्यात सालई, नांदुरी, जांबू, राणीतंबोळी, कुटुंगा, रंगुबेली, हिराबंबई, कारादा, चखाबौंड, गोलाई, रेहट्या, दादरा, शिरपूर, काटकुंभ, बेदराबल्डा, खाऱ्याटेभरु, हरदोली, नागझीरा, बैरागड व पानखाल्या ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांची निवडणूक होणार आहे. दर्यापूर तालुक्यात करतखेडा, घोडनदी, कळासी, लेहगाव येथील रिक्त पदांसाठी निवडणूक होणार आहे. चांदूरबाजार तालुक्यात खरपी, खराळा, मिर्झापूर, तळणीपूर्णा, गोविंदपूर, कलोडी, मासोद, ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी निवडणूक होत आहे. वरुड तालुक्यात गणेशपूर, गोरेगाव व उसाड येथील रिक्त पदांसाठी निवडणूक होत आहे. भातकुली तालुक्यात गणोरी, मार्की, हातखेडा, जसापूर, कुमागड कुंड, बैलमारखेडा, साऊर, कवठा बहाळे, हातुर्णा, परलाम या ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांचा समावेश आहे. मोर्शी तालुक्यात मायवाडी, वऱ्हा, शिरुर, गोशळा, बेलोणा या ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी निवडणूक होणार आहे. (प्रतिनिधी)