शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनापूर्वीच पालिका निवडणूक प्रक्रिया

By admin | Updated: October 9, 2016 01:09 IST

नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा एकंदरित वेग पाहता, राजयभरातील नगरपालिका व नगर पंचायतींच्या ...

नोव्हेंबरला मुहूर्त : तयारीला आलाय वेगचांदूरबाजार : नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा एकंदरित वेग पाहता, राजयभरातील नगरपालिका व नगर पंचायतींच्या निवडणुका निधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी नोव्हेंबर अखेरपर्यंत त्या घेतल्या जाऊ शकतात. महापालिका व जिल्हा परिषद फेब्रुवारीमध्येच होऊ शकतात.राज्यभरातील १९५ पालिकांची मुदत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात संपत आहे. या पार्श्वभूमिवर नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम नोव्हेंबर अखेरपर्यंत पार पडला जाण्याची दाट शक्यता आहे. ५ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणारे हिवाळी अधिवेशन व ६ डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीप्रित्यर्थ होणारी गर्दी लक्षात घेता नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत नगरपालिका निवडणुकांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना निवडणूक विभागाकडून आखण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून, पोलीस व इतर शासकीय यंत्रणांकडून चाचपणी करण्यात येत आहे. दिवाळीनंतर कोणताही सण किंवा राजकीय कार्यक्रम नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा फारसा प्रश्न निर्माण होणार नाही, असा अंदाज निडणूक आयोगाकडून लावला जात आहे. तसेच महानगरपालिकांची मुदत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, तर जिल्हा परिषदांची मुदत दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात संपत आहे. फेब्रुवारीच्या १० तारखेनंतर बारावीची परीक्षा व मार्चमध्ये दहावीची परीक्षा सुरू होत आहे, तसेच फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच मुंबई, ठाणे, पुण्यासह एकूण १० नगरपालिकांच्या निवडणुका होतील, त्याच पाठोपाठ आठवडाभराच्या अंतराने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)सत्ताधारी भाजपचे निवडणुकीवर पूर्ण लक्षपालिकांमध्ये आजच्या घटकेला बहुतांश ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रादी काँग्रेसची सत्ता आहे. यावेळी राज्यात सत्ता असल्याने भाजप यंदा या निवडणुकीत सर्वच ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच यावर्षीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक व दोन सदस्यीय प्रभाग रचना पद्धती तयार केली आहे. यात भाजप किती यशस्वी होते हे येणारा काळच सांगू शकेल. हे जरी खरे असले तरी यात भाजलाच यश मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे. परंतु जनतेने मधून थेट निवडून येणारा अध्यक्ष पुढे विधानसभेसाठी आपल्यालाच स्पर्धक ठरू शकतो, या भीतीपोटी भाजपमधील काही मंत्री व आमदारांचा थेड निवडणूक पद्धतीला अंतर्गत विरोध आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भाजपचाच अध्यक्ष निवडून यावा, यासाठी निवडणूक प्रचारावर मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून असल्याचे कळते