शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी संत्रा उत्पादकांची आठ वर्षांपासून पायपीट

By admin | Updated: August 13, 2014 23:35 IST

मोर्शी तालुक्यातील सावरखेड (पिंगळाई) येथील शेतकरी एकनाथ ठवळी यांच्या शेतात २००७ मधील अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते. त्यामुळे संत्रा झाडे खराब होऊन आठ लाखांचे नुकसान झाले.

नेरपिंगळाई : मोर्शी तालुक्यातील सावरखेड (पिंगळाई) येथील शेतकरी एकनाथ ठवळी यांच्या शेतात २००७ मधील अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते. त्यामुळे संत्रा झाडे खराब होऊन आठ लाखांचे नुकसान झाले. सदर नुकसानाची भरपाई देण्यासाठी विभागीय आयुक्तांनी कृषी पणन विभागाच्या मुख्य सचिवांना अहवाल दिला. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही. आठ वर्षांपासून शेतकरी ठवळी संबंधीत कार्यालयात पायपीट करीत असून अद्यापही त्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.सावरखेड येथील शेतकरी एकनाथ ठवळी व मुलगा संदीप ठवळी यांचे पाझर तलावालगत शेत सर्व्हे नं. २३२ व २३३ शेत असून त्यामध्ये संत्रा झाडे होती. २००७ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमध्ये तलाव ओव्हरफ्लो होऊन तलावाखालच्या बाजूने पाझरल्याने या शेतामधील संपूर्ण संत्रा झाडे खराब होऊन शेती निरस झाली. तालुका कृषी अधिकारी मोर्शी यांच्या अहवालानुसार तसेच जिल्हाधिकारी यांनी २४ एप्रिल २०१० रोजी अप्पर मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रानुसार ठवळी यांचे ७ लक्ष ९२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांनी नुकसान भरपाई मिळण्यात यावी, असे कळविले आहे. तसेच अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी यांनादेखील १२ मार्च २०१३ रोजी शासनास पत्र देऊन या शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याचे कळविले आहे. परंतु शासनाने गेल्या आठ वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष केले.एकनाथ ठवळी यांचा शेतीचाच व्यवसाय असल्याने शेती पिकाच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी तसेच शेतीच्या मशागतीसाठी त्यांनी कर्ज तसेच नातेवाईकांकडून उसनवारी घेऊन ते कर्जबाजारी झाले आहेत. याप्रकरणी ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करुन शासनाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठ वर्षांपासून न्यायासाठी वणवण भटकत विविध शासकीय कार्यालये पालथे घालूनही अद्याप न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी आता लवकर न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)