शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आठ तालुके राहणार वंचित!

By admin | Updated: April 20, 2015 00:28 IST

राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीसाठी आपादग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय..

अवकाळीची मदत : संयुक्त अहवालानुसार सहाच तालुके बाधितगजानन मोहोड ल्ल अमरावतीराज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीसाठी आपादग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिलला घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना अवकाळीचा तडाखा बसला असताना जिल्हा प्रशासनाच्या अहवालात केवळ आठ तालुक्यांचीच नोंद आहे. त्यामुळे या आठ तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. राज्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे व्यक्ती व जनावरे यांची जीवित हानी, घरांची पडझड, शेतजमिनीचे आणि शेतीपिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. याबाबत ‘विशेष बाब’ म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. अवकाळीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतीपिकांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालात अमरावती, धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव, चांदूररेल्वे, भातकुली तालुक्याची नोंद आहे. केंद्राच्या परिपत्रकाने जागविली आशाकेंद्र शासनाने ८ एप्रिलला परिपत्रक जारी करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. एप्रिल २०१५ ते २०२० पर्यंतच्या नुकसानीसाठी ‘एसडीआरएफ’ वाढीव अनुदान देण्याची शिफारस केली. यामध्ये फेब्रुवारी व मार्च २०१५ च्या अवकाळी बाधितांचा समावेश करण्याचे निर्देश दिल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदतीची आशा आहे.