शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत आठ महिने जकात!

By admin | Updated: March 27, 2015 00:05 IST

महापालिकांमधील स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

अमरावती : महापालिकांमधील स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एलबीटीला पर्याय म्हणून आॅगस्ट-२०१५ पासून ‘व्हॅट’मध्ये वृध्दीचा निर्णय विचाराधीन आहे. मात्र, ‘व्हॅट’ला असलेला कडवा विरोध लक्षात घेता शासन आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या आठ महिन्यांच्या काळात जकात कर लागू करुन महापालिकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.भाजपने निवडणुकांच्या काळात एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना एलबीटी रद्द झाल्याची घोषणा करून व्यापाऱ्यांना खुश केले. मात्र, आॅगस्टपासून एलबीटीला नवीन पर्याय शोधला जाईल, असे महापालिकांना आश्वासित केले. परंतु व्यापाऱ्यांना एलबीटीऐवजी इतर कोणताही कर नको आहे. यामुळे एलबीटीला पर्याय शोधण्याच्या शासनाच्या भूमिकेमुळे आपली चक्क फसवणूक झाली ही भावना राज्यभरातील व्यापाऱ्यांमध्ये रुढ झाली आहे. एलबीटीच्या मुद्याला अनुसरुन व्यापाऱ्यांनी राज्य शासनासोबत दोन हात करण्याची तयारीदेखील सुरु केली आहे. पुणे येथे ‘फॅम’चा मेळावा आयोजित करुन एलबीटीबाबत फसवणूक झाल्याची चर्चादेखील करण्यात आली. राज्य शासनाने दिलेला शब्द पाळावा, ही मागणी व्यापाऱ्यांची आहे. परंतु एलबीटी रद्द केल्यानंतर पर्यायी व्यवस्था कोणती? यासंदर्भात शासन विचारमंथन करीत आहे. केंद्र शासनाची ‘जीएसटी’ ही एकमेव करप्रणाली १ एप्रिल २०१६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठी मुंबई महापालिकेत जकात कर पूर्ववत सुरु ठेवण्यावर शासनाचे एकमत झाले आहे. मात्र, उर्वरित २५ महापालिकांमध्ये ‘एलबीटी’च्या बदल्यात जादा व्हॅट आकारणी करण्याची शासनाची तयारी आहे.