शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

‘आसमां निगल गया या जमीं खा गयी ?’

By admin | Updated: May 25, 2017 00:06 IST

आयपीएल क्रिकेट सट्टा प्रकरणातील मुख्य बुकी कुख्यात संजय उदापूरकर १२ दिवसांपासून पसार आहे.

गेला कुठे उदापूरकर? : पोलिसांपेक्षा सट्टा किंग चाणाक्षलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : आयपीएल क्रिकेट सट्टा प्रकरणातील मुख्य बुकी कुख्यात संजय उदापूरकर १२ दिवसांपासून पसार आहे. एसपी अभिनाष कुमार यांच्या नेतृत्वातील पोलीस दल या बुकीला पकडण्यात अपयशी ठरले आहे. त्याच्या ठावठिकाण्याबाबत सामान्यजनांमध्ये चर्चा होत असताना पोलिसांना तो सापडू नये, हे आश्चर्यच. ‘आसमां निगल गया, या जमीं खा गयी’ असा सवाल याप्रकरणी उपस्थित होत आहे. पोलीस अधीक्षकांनी प्रारंभी अनेक दिवस चुप्पी साधली. मौन सोडले त्यावेळी उदापूरकरला अटक केली जाईल, असे रुटीन उत्तर त्यांनी दिले. मात्र पोलिसांना ‘आॅपरेशन उदापूरकर’मध्ये ठोस यश आले नाही. वास्तविकत: उदापूरकर हा जिल्ह्यातील सट्टा किंग म्हणून नावारुपास आला असून त्याचा मुख्य बुकीत समावेश आहे. वरलीमटक्याचे जाळे, क्रिकेट सट्ट्यातून भरमसाठ कमाई हे ध्येय संजय उदापूरकरने पोलिसांच्या मदतीनेच पुर्णत्वास नेले आहे. जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यात त्याचे एजंट असून ते मटक्यासह क्रिकेट बुकी घेतात. उदापूरकर परतवाडा येथील छोटा बाजार परिसरातून हे संपूर्ण नेटवर्क सांभाळतो. धारणी व चिखलदरा तालुक्यात त्याचे अनेक टेबल हाऊस चालत असल्याची माहिती आहे. तो सट्टा किंग असल्याचे पोलीस दलात सर्वश्रूत आहे. १२ मे रोजी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी स्थानिक सावकारपुरा भागात धाड टाकून आयपीएल क्रिकेट सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक केली होती. या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार संजय उदापूरकर असल्याचा जबाब आरोपींनी दिला होता. दरम्यान त्याला अटक करण्यास पोलीस दिरंगाई करीत होते. तो राजस्थानात आहे. त्याचा फोटो उपलब्ध नाही, असेही सांगण्यात आले होते. मात्र, त्याला अटक केल्यावर जामीन मिळू नये, असे प्रयत्न करीत असल्याचे सांगून स्वत:चा बचाव पोलिसांनी केला होता.‘लोकमत’ने उदापूरकरचा फोटो प्रसिद्ध करताच तो लवकरच जेरबंद होईल, अशी संकेत होते. मात्र संजय उदापूरकर गत १२ दिवसांपासून पसार आहे. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. उदापूरकर पसार होणे ही बाब पोलिसांसाठी नामुष्कीची ठरली, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.राजस्थानात नव्हे जिल्ह्यात लपून बसलाय उदापूरकर कुख्यात संजय उदापूरकरचा मोबाईल ट्रेस केला जात असून तो राजस्थानात असल्याची माहिती पोलीस देत आहे. मात्र, तो जिल्ह्यातच असल्याची विश्वसनीय माहिती आहे. उदापूरकर मेळघाटात लपून आहे. येथील एका स्थानिक नेत्याने त्याला आश्रय दिल्याचे उघडपणे बोलले जात आहे. आश्रयदात्या राजकीय नेत्याला सध्या फंडची गरज असल्याने उदापूरकर याला मदत मिळत असल्याची माहिती आहे.