शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
4
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
5
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
6
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
7
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
8
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
9
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
10
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
11
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
12
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
13
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
14
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
15
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
16
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
17
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
18
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
19
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
20
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार

शिक्षण विभागातील अधिकारी कारवाईच्या रांगेत

By admin | Updated: August 28, 2015 00:35 IST

शिक्षण आयुक्तपदाचा कार्यभार स्वाकारल्यापासून आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले.

अमरावती : शिक्षण आयुक्तपदाचा कार्यभार स्वाकारल्यापासून आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्यात अमरावतीच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांचाही समावेश आहे. नुसते उपसंचालकच नव्हे, तर शिक्षण विभागातील अनेक अधिकारी कारवाईच्या रांगेत आहेत. जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अमरावती दौऱ्यावर आले असता पुरुषोत्तम भापकर हे विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनीच स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. शिक्षण विभागात अधिकाऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत घटकांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येकाची जबाबदारी ठाम आणि तो सक्षमपणे पार पाडतो की नाही यासाठी की रिझल्ट एरिया (केआरए) पद्धती अवलंबिली जात आहे. आता एका क्लिकवर सर्वांची कुंडली उघड होईल, शिक्षण विभागातील विविध अधिकाऱ्यांची चौकशी प्रलंबित होती. ती मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. ज्या-ज्या ठिकाणी गैरव्यवहार झालेत त्याची चौकशी झाली. पण, कारवाईसाठी ठोस यंत्रणा नसल्याने चौकशी होऊनही संबंधित अधिकारी नामानिराळे राहायचे. यातील काही अधिकारी सेवानिवृत्तीला आले तरी त्यांच्यावरील कारवाई प्रलंबित राहायची. अलीकडे ती कारवाई झाली त्यात सेवानिवृत्तीला पोहोचलेल्यांचाही समावेश आहे. एकदा निवृत्त झाले की आपले कुणी काही बिघडवू शकत नाही, असा गैरसमज कुणी करून घेऊ नये. यानिमित्ताने संदेश देण्याचे काम झाले. राज्यात एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, असा राज्य शासनाचा प्रयत्न असून आम्ही त्यादृष्टीने पावले टकत आहोत. एखाद्या शाळेत चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अप्रगत राहिल्यास संबंधितांना जाब विचारला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)