शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर तालुक्यात ‘ई’ टेंडरींग घोटाळा

By admin | Updated: March 4, 2016 00:14 IST

राज्य व केंद्र शासनाचा लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतीत करण्यात आल्यावर ग्रामपंचायतीमार्फत निविदा ‘ई-टेंडर’ प्रणालीनुसार काढण्याचे आदेश आहेत.

चौकशीचे आदेश : सचिव-कंत्राटदाराचे साटेलोटे, संगणक संचालकांची साथपरतवाडा : राज्य व केंद्र शासनाचा लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतीत करण्यात आल्यावर ग्रामपंचायतीमार्फत निविदा ‘ई-टेंडर’ प्रणालीनुसार काढण्याचे आदेश आहेत. ती सुविधा पारदर्शीपणे न करता त्यालाच हाँग करीत अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये संगणक संचालक, सचिव कंत्राटदाराच्या मदतीने मर्जीप्रमाणे वापर सुरू असल्याची तक्रार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.अचलपूर तालुक्यात पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती बांधकामासह इतर कामांसाठी शासन नियमानुसार ‘ई-टेंडर’ प्रणालीद्वारे कामाचे कंत्राट देणे बंधनकारक आहेत. मात्र तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत संगणक केंद्रावरून हे सर्व शासकीय कामे होत असल्याची तक्रार दस्तुरखुद्द पंचायत समिती सदस्या प्रीती प्रवीण गाडगे यांनी केल्याने सचिव, संगणक संचालक, कंत्राटदार व काही कमीशन घेऊन या कार्याला साथ देणाऱ्या सरपंचांचे पितळ उघडे पडले आहे. ई-टेंडर प्रणालीनुसार सरपंच व सचिव यांची डिजिटल स्वाक्षरी संगणक संचालकाकडे आहे. निविदा प्रक्रिया राबविताना कुठल्या कंत्राटदाराने कुठल्या दराने ती भरली आदी सर्व बाबी गोपनीयतेचा भाग आहे. मात्र ग्रामपंचायतअंतर्गत संगणक संचालक व कंत्राटदार या गोपनीयतेचा भंग करीत सचिव व काही सरपंचांना हाताशी धरून मर्जीतील कंत्राटदारांना ती माहिती पुरवीत असल्याची तक्रार प्रीती गाडगे यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत केली आहे. परिणामी मर्जीतील कंत्राटदार व कमीशनखोरीमुळे कामाचा दर्जा खालावला असल्याचे चित्र आहे. ई-टेंडर प्रक्रिया राबविणारे संगणक संचालक रात्री-बेरात्री मर्जीनुसार या प्रणालीचा वापर स्वहितासाठी करीत आले आहेत. दुसऱ्या कंत्राटदारांचे दर मर्जीतील कंत्राटदाराला दाखवून शासन नियमांचा भंग संपूर्ण तालुक्यात खुलेआम सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)