शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सदारांमुळे पोतदारांची पदोन्नती बाधित !

By admin | Updated: March 19, 2017 00:06 IST

महापालिकेकडून कुठलीही मुदतवाढ मिळाली नसताना अनधिकृतपणे शहर अभियंत्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या जीवन सदारांमुळे अन्यायाची हॅट्ट्रिक पूर्ण झाली आहे.

नियमभंग : बेकायदेशीरपणे कार्यालयाचा ताबा अमरावती : महापालिकेकडून कुठलीही मुदतवाढ मिळाली नसताना अनधिकृतपणे शहर अभियंत्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या जीवन सदारांमुळे अन्यायाची हॅट्ट्रिक पूर्ण झाली आहे. एकीकडे सदार यांच्यासाठी संजय पवार आणि गहेरवार यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदस्थापना दिल्याचा मुद्दा ज्वलंत बनला असताना सदारांमुळेच अनंत पोतदार यांची पदोन्नती बाधित झाली आहे. गुडेवारांच्या कार्यकाळात कंत्राटी सेवानिवृत्त म्हणून शहर अभियंत्यांच्या खुर्चीवर बसलेल्या सदार यांना दीड वर्षांनंतरही या खुर्चीचा मोह सुटलेला नाही. त्यासाठी आधी पवार त्यानंतर सोनवणे आणि आता गहेरवार यांचा प्रशासकीय बळी घेण्यात आला. मात्र या अन्यायाविरुद्ध गहेरवार हे दाद मागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पवार आणि सोनवणेप्रमाणे ते अन्याय मुकाटपणे सहन करणाऱ्यांतील नसून हा वाद लवकरच पीडब्ल्यूडी, जीएडी आणि युडीपर्यंत पोहोचविला जाणार आहे. महापालिकेत अत्यंत महत्त्वपूर्ण विभागापैकी एक असलेल्या बांधकाम विभागातील शहर अभियंता हे मुख्य पद प्रतिनियुक्तीचे आहे. तेथे पाच वर्षे ज्ञानेंद्र मेश्राम या महापालिका अस्थापनेवर असलेल्या अभियत्यांनीही जबाबदारी सांभाळली. मेश्राम यांच्या कार्यकाळात पीडब्ल्यूडीने कुणालाही प्रतिनियुक्तिकरुन पाठविल्याने आतासारखा वाद निर्माण झाला नाही. मात्र गहेरवार यांच्या येण्याने सदार की गहेरवार, असा भला मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रसंगी नियमभंग करून आणि शासन निर्णयाला ठेंगा दाखवत सदार यांची नियुक्ती वा मुदतवाढ नियमानुकूल करण्याचा खटाटोप यंत्रणेने चालवला आहे. यावरून सदार यांचे ‘चिपकू’ कौशल्य अधोरेखित झाले आहे. कंत्राटी व्यक्तीला आर्थिक व्यवहाराचा प्रभार देऊ नये, असा साधा सरळ नियमही सदारांच्या प्रेमापोटी पायदळी तुडविला जात आहे. आतापर्यंत अतिरिक्त शहर अभियंता म्हणून ओळख दाखविणाऱ्या सदारांनी आता ती ओळख पुसली असून ते ‘शहर अभियंता’ या बड्या पदाच्या तोऱ्यात शिरले आहेत. मात्र कागदोपत्री त्यांना राजापेठ ओव्हरब्रीज या विवादित कामासाठी कंत्राटी म्हणून घेण्यात आले व त्यांची मुदतवाढही संपुष्टात आली. शासकीय-निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करारपद्धतीने विवादित कामासाठी घेण्यासंदर्भात जीएडीने १७ डिसेंबर २०१६ ला एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. अशा करार नियुक्तीमुळे शासन सेवेत असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे बंधनकारक आहे. मात्र सदार यांना प्रेमापोटी वारंवार मुदतवाढ देताना या अटीचा भंग करण्यात आला. कार्यकारी अभियंता १ म्हणून प्रभार सांभाळणारे अनंत पोतदार यांच्या सेवानिवृत्तीला आठ-नऊ महीने राहिले असतांना त्यांची शहर अभियंतापदी पदोन्नती होणे अपेक्षित आहे. मात्र उघड डोळ्याने पोतदार यांच्या पदोन्नतीवर सदारांच्या नियुक्तीचा प्रतिकूल परिणाम होत असताना शासन निर्णयाला आव्हान दिले जात आहे. नियमबाह्यतेची तक्रार सदार यांच्या नियुक्ती आणि मुदतवाढीबाबत महापालिकेत शासन निर्णयाचा अनादर चालविल्याची तक्रार विभागीय आयुक्तांसह नगर विकास विभागाकडे सोमवारी केली जाणार आहे. शिवसेनाचा स्थानिक पदाधिकारी या मनमानी विरोधात सरकारकडे दाद मागणार आहे. नगरविकास देईल का लक्ष ?सदार यांची नियुक्ती व मुदतवाढ त्यांना दिलेला अतिरिक्त कार्यभार आणि मानधन असे सारेच मुद्दे वादग्रस्त बनले असताना पालक म्हणून या सर्व गंभीर अनियमिततेकडे नगरविकास विभाग लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.