शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार’शिवभोजन’थाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

जिल्ह्यात २३ केंद्र ;२ हजार ५०० जणांना लाभ अमरावती : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहे. ...

जिल्ह्यात २३ केंद्र ;२ हजार ५०० जणांना लाभ

अमरावती : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहे. याच काळात गरीब, गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाने मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था विविध केंद्रांवर केली आहे. जिल्ह्यात २३ केंद्रांवर या दररोज २,५०० शिवभोजन थाळी मोफत उपक्रमाची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन कार्यक्रम आखला आहे. बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतापासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. दरम्यान, हे करतानाच दुर्बल घटकाच्या अडचणी रोखण्यासाठी त्यांना विविध पॅकेज शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. गरिबांची जेवणासाठीची समस्या थांबविण्यासाठी शिवभोजन योजनेतून प्रत्येक केंद्रावर मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. गतवर्षी २६ जानेवारीपासून ही योजना आघाडी सरकारने सुरू केली. त्यानुसार प्रत्यक्षात शिवभोजन केंद्र सुरू झाले. या केंद्रात ठरवून दिलेल्या वेळेत येणाऱ्या नागरिकांना सर्व केंद्र मिळून २,५०० थाळीचा लाभ दिला जात आहे. यापूर्वी लाभार्थ्यांकडून ५ रुपये घेतले जात होते. मात्र, १५ एप्रिलपासून मोफत सुविधेच्या लाभाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

महा अन्नपूर्णा ॲपवर माहिती संकलन

या योजनेंतर्गत मिळणाऱ्या थाळीत ३०० ग्रॅमच्या दोन चपाती, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण दिले जात आहे. प्रत्येक केंद्राला गरजू लोकांनाच थाळी देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा फोटो केंद्र चालकांकडून काढला जातो. तो फोटो अन्नपूर्णा ॲपवर केंद्रचालकाकडून डाउनलोड केले जातात. त्यावरून प्रत्येक केंद्रात दररोज किती लोकांनी लाभ घेतला याची माहिती संकलित होते. अशी माहिती केंद्राच्या संचालक वसंत कोैसकीया यांनी दिली.

बॉक्स

जिल्ह्यात असे आहेत शिवभोजन केंद्र

अमरावती ५, दर्यापूर २, अचलपूर २, नांदगाव खंडेश्र्वर २, तिवसा १, धारणी १, चांदूर बाजार १, चांदूर रेल्वे १, भातकुली १, अंजनगाव सुर्जी १, धामणगाव रेल्वे २, चिखलदरा १, वरूड १ आणि मोर्शी १ असे एकूण २३ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. २३ केंद्र, दररोज २५०० जणांना लाभ दिला जात आहे.

कोट

बॉक्स

थाळीचा लाभ घेणारे

कोट

शिवभोजन थाळी मुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळाला आहे. हातमजूर बेरोजगार व निराधारांना गेल्या वर्षभरापासून शिवभोजन थाळी वरदान ठरले असून थाळी व्दारे दिले जाणाऱ्या भोजनाचा दर्जा हि समाधान कारक आहे.

आकाश सोळंके

कोट

शिवभोजन थाळी फक्त गोरगरिबांसाठीच आहे असे नव्हे, तर मध्यमवर्गीयदेखील याचा आस्वाद घेतात. विशेष म्हणजे थाळीचा दर्जा आजवर टिकून आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरत आहे.

- अतुल चौधरी,

संचालक, शिवभोज केंद्र

कोट

शिवभोजन योजनेअंतर्गत थाळीचा लाभ मोफत मिळणार असल्याने गोरगरीब नागरिकांची थोडीफार सोय झाली आहे. मिनी लॉकडाऊन दरम्यान शिवभोजन केंद्र व लाभार्थी संख्या वाढविल्या त्याचा फायदा अनेकांना मिळू शकेल.

- उषा भोसले,

बॉक्स

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र : २३

दररोज किती जण लाभ घेतात : २५००