शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा रेल्वेस्थानकावर दारूड्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:32 IST

मागिल आठवड्यापासून एक मद्यपी रेल्वेस्थानक परिसरात धुमाकूळ घालीत असून महिला प्रवाशांची छेडही काढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमहिला प्रवाशांमध्ये धास्ती : रेल्वे पोलीस करतात तरी काय?

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : मागिल आठवड्यापासून एक मद्यपी रेल्वेस्थानक परिसरात धुमाकूळ घालीत असून महिला प्रवाशांची छेडही काढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मद्यप्राशन करून सदर इसम वाटेल तशी शिवीगाळ करीत असतोे. त्यामुळे येथील सुरक्षेबाबत बडनेरा रेल्वे पोलिसांचे काहीच कर्तव्य नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे. बडनेरा रेल्वेस्थानकावर अलिकडे मोठ्या संख्येने बाहेरून आलेल्या भटक्यांनी तळ ठोकल्याने एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.बडनेरा रेल्वे स्थानक हे ‘जंक्शन’ म्हणून ओळखले जाते. येथून दरदिवशी मोठ्या संख्यने प्रवासी ये-जा करतात. बडनेरा रेल्वे स्थानकाला स्वच्छतेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून उत्तम दर्जाचे रेल्वेस्थानक म्हणून मानांकन मिळाले आहे. अशा रेल्वे स्थानकाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, आठवडाभरापासून एक दारूडा अर्धनग्न अवस्थेत या रेल्वे स्थानक परिसरात फिरून राजरोसपणे शिवीगाळ करीत आहे. शिवाय महिला प्रवाशांनाही तो त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, तरीही रेल्वे पोलिसांना याबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.सदर मद्यपी सोमवार १८ सप्टेंबर रोजी दुपारी तिकिटघराजवळील एका भिंतीवर दगड फेकून पादचारी पुलावरून ये-जा करणाºया प्रवाशांना जोरजोरात शिवीगाळ करीत होता.यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी या दारूड्यावर तत्काळ कारवाई करावी व प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.बडनेरा स्थानकावर वाढली ‘मुसाफिरां’ची संख्याबडनेरा रेल्वेस्थानक परिसरात ‘हरियाल’ नामक राष्टÑीय पक्ष्याची शिकार झाल्याच्या घटनेनंतर यापरिसरातून ‘मुसाफिर’ पसार झाले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पुन्हा मुसाफिरांची गर्दी रेल्वे स्थानक परिसरात दिसून येऊ लागली आहे. रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांनी देखिल याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.‘त्या’ दारूड्यावर व्हावी कारवाईमागील आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी मध्यंतरी या दारूड्याला धमकावून समज दिला होता. मात्र, त्यानंतरही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे आता रेल्वे पोलिसांनी या दारूड्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.