शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:42 IST

वाढत्या चेनस्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्याकरिता शहरातील नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामध्ये या आठवड्यात पोलिसांनी शेकडो वाहनांची तपासणी करून ३५० पेक्षा अधिक वाहनचालकांवर एमव्ही अ‍ॅक्टनुसार धडक कारवाई केली. यामध्ये शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देचेनस्नॅचर्ससाठी शोधमोहीम : कोतवाली हद्दीत सर्वाधिक कारवाया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाढत्या चेनस्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्याकरिता शहरातील नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामध्ये या आठवड्यात पोलिसांनी शेकडो वाहनांची तपासणी करून ३५० पेक्षा अधिक वाहनचालकांवर एमव्ही अ‍ॅक्टनुसार धडक कारवाई केली. यामध्ये शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाई करण्यात आली.पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी बुधवारपासून दोन तास शहरातील विविध परिसरात नाकाबंदी केली. त्यामध्ये विनाक्रमांकाची वाहने, अवैध वाहतूक, ट्रिपल सिट, विना परवाना वाहतूक करणारे, वाहतुकीस अडथळा आणणाºया वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये बडनेरात २, फे्रजरपुºयात १२, गाडगेनगरात १२, नागपुरी गेट ५, वलगाव २, नांदगाव पेठ २, राजापेठ २३, कोतवाली २५, खोलापुरी गेट १०, भातकुली २ पूर्व वाहतूक शाखेच्या १४, पश्चिमच्या १८, गुन्हे शाखेच्या २७ अशा एकूण १५४ वाहनचालकांविरुद्ध एमव्ही अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.विना क्रमाकांच्या ८७ वाहनांवर कारवाईशहरात विना क्रमांकाच्या ८७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये बडनेरा हद्दीत २, गाडगेनगरात ११, नांदगाव पेठ २, राजापेठ २, कोतवाली २४, खो.गे. ६, वाहतूक शाखेने २५, गुन्हे शाखेने १५ वाहनांवर कारवाई केली. विना क्रमाकांच्या कारवरही कारवाई केली१२ आॅटोंवर कारवाईनियमबाह्य व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ आॅटोंवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये राजापेठ पोलिसांनी ८, कोतवालीत १, वाहतूक शाखेने ३ आॅटोवर कारवाई केली आहे.ट्रिपल सीटच्या दहा कारवायाट्रिपल सिट वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारच्या मोहिमेत पोलिसांनी १० ट्रिप्पल सिट वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यात फे्रजरपुराने २, राजापेठ ४ व खोलापुरी गेटमध्ये ४ दुचाकीवर कारवाया केल्यात.राजापेठ पोलिसांकडून सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवायाराजापेठ पोलिसांनी १५ जूनपर्यंत ६४० आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाई करणारे राजापेठ ठाणे ठरले आहे. कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा सुरु केला. सर्व ठाणेदारांना सूचना देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस जोमाने कामाला लागले होते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची धरपकड सुरू झाली. पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कलम १०७ व ११६ प्रमाणे कारवाई करून त्यांची सहायक पोलीस आयुक्तासमोर पेशी केली. यामध्ये अन्य ठाण्याच्या तुलनेत राजापेठ पोलिसांनी सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाया केल्याचे निदर्शनास आले आहे.