शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासियांचे घरकुलाचे स्वप्न साकार

By admin | Updated: March 4, 2016 00:06 IST

शहरवासियांचे घरकुलाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित अमरावती महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित होत आहे.

अमरावती : शहरवासियांचे घरकुलाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित अमरावती महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित होत आहे. यासाठी आवश्यक अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून लाभार्थ्यांना हे अर्ज आॅनलाईन सादर करावयाचे आहेत. शहरातील हजारो नागरिकांना या योजनेतून हक्काची घरे मिळतील, असा आशावाद महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी व्यक्त केला. राज्यातील ५१ शहरांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. यात अमरावती महापालिकेचा समावेश आहे. लाभार्थ्यांना याबाबतचे अर्ज १५ मार्चपर्यंत आॅनलाईन भरावयाचे असून महापालिका यात कन्सलटन्सी म्हणून काम पाहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. १५ मार्चची ‘डेडलईन’अमरावती : गुरुवारी यासंदर्भात पालिका आयुक्त गुडेवार यांच्यासह महापौर रिना नंदा व महापालिकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली. महाराष्ट्रातील ५१ शहरांमध्ये राबविली जाणाऱ्या या योजनेसाठी ५३८ कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे- २०२२ या संकल्पनेवर आधारित आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये चार विविध घटक नेमून देण्यात आले आहेत. यात अमरावती शहरामध्ये झोपडपट्टी विकासाचा आराखडा नसल्याने पहिल्या घटकावर अमरावती शहरात काम केले जाणार नाही. उर्वरित तीन घटकांसाठी लाभार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरता येईल. प्रधानमंत्री आवास योजनेचा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होईल. किमान १४०० ते १५०० कर्मचाऱ्यांना या योजनेतून घरे मिळू शकतील. पालिकेच्या जागेवर आम्ही ती बांधून देऊ शकतो, अशी ग्वाहीदेखील गुडेवार यांनी दिली. पत्रपरिषदेला अविनाश मार्डीकर, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, दिनेश बूब आदी पदाधिकारी उपस्थित होते. भागिदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मितीसदर घटकांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता शासकीय यंत्रणा व खासगी संस्थांच्या भागिदारीतून घरकुलांच्या निर्मितीचे उद्दिष्ट्य आहे. अशा प्रकल्पांकरिता केंद्र शासनाकडून रुपये १.५० लक्ष प्रतिघरकूल इतके अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या घटकाखाली ३० चौरस मीटर चटई क्षेत्रापर्यंतची घरकुले अनुज्ञेय आहेत. या घटकांखाली राज्य शासनामार्फत प्रति घरकुल १ लक्ष इतके अनुदान अनुज्ञेय राहील. सादर प्रकल्पांमध्ये किमान २५० घरकुले असणे आवश्यक आहे. प्रकल्पामध्ये खासगी तसेच शासकीय, निमशासकीय संस्था स्वतंत्रपणे सहभागी होऊ शकतील. (प्रतिनिधी)व्यक्तिगत घरकूल बांधण्यास अनुदानआर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील पात्र कुटुंबांना स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घरकूल बांधण्यास अथवा राहत्या घराची वाढ करण्यास केंद्र शासनाकडून १.५० लाखांपर्यंत अनुदान उपलब्ध करण्यात येईल. परंतु अशा लाभार्थ्यांचा समावेश सर्वांसाठी घरे कृती आराखड्यात असणे आवश्यक आहे. या घटकाखाली राज्य शासनाकडू १ लाख रूपयांचे अनुदान देय असेल. पात्र लाभार्थ्यांचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह नागरी स्वराज्य संस्थांकडे सादर केल्यानंतर योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार छानणी केली जाईल व लाभार्थ्यांची आर्थिक क्षमता विचारात घेऊन सुसंगत प्रस्ताव एकत्र करुन राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीसमोर मान्यतेसाठी सादर होतील.