शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईकांच्या स्वप्नातील कृषिक्रांती घडवा

By admin | Updated: July 2, 2016 00:07 IST

हरितक्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सर्वत्र ओळख निर्माण केली आहे.

कृषीदिन : प्रवीण पोटे यांचे प्रतिपादनअमरावती: हरितक्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सर्वत्र ओळख निर्माण केली आहे. त्याचा जन्मदिन १ जुलै हा कृषिदिन म्हणून साजरा करत असताना त्यांच्या स्वप्नातील कृषी क्षेत्रात क्रांती घडविणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी केले. ते जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन व कृषी जागृती सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण सभापती सरिता मकेश्र्वर, माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे, सदस्य अभिजित ढेपे, सीईओ सुनील पाटील, कृषी अधीक्षक अधिकारी दतात्रय मुळे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, आत्मा प्रकल्पाचे संचालक रवींद्र जाधव, डेप्युटी सीईओ जे.एन आभाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, वसंतराव नाईकांनी त्यांच्या कारकिर्दीत पंचायतराज संस्था, रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार, धान्य खरेदी, संकरित बी-बियाणे यासारख्या शेतीशी निगडित उपक्रम राबवून शेतीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला. वसंत बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाण्याचा स्त्रोत वाढण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या या कार्याची दखल घेत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शासनामार्फत शेतकरी हिताच्या अनेक नवीन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र हे करताना शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना कृषी सप्ताहानिमित्त नव्हेतर त्या नियमित पोहोचविण्याची जबाबदारी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने पार पडावी, असे सांगितले. यावेळी जि.प. अध्यक्ष सतीश उईके यांनीही विचार मांडलेत. सीईओ सुनील पाटील, कृषी अधीक्षक दतात्रय मुळे यांनी प्रास्तावीक केले. संचालन क्षीप्रा मानकर, आभार आत्माचे प्रकल्प संचालक रवींद्र जाधव यांनी केले.