ग्रीनफील्डसह रेट्रोफिटिंग मॉडल्स : ३० जूनअखेर प्रस्तावअमरावती : केंद्र पुरस्कृत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य प्रवेशासाठी महापालिकेने २२६८ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव बनविला आहे. ग्रीनफील्ड व्यतिरिक्त रेट्रोफिटिंग, पॅनसिटी आणि रि-डेव्हलपमेंट ही तीन मॉडेल्स या फेरप्रस्तावाची वैशिष्ट्ये आहेत. ही बहुप्रतीक्षित फेरप्रस्तावाचे प्रारूप ३० जूनपर्यंत केंद्र शासनाला पाठविले जाणार असल्याची माहिती शनिवारी आयुक्त हेमंत पवार यांनी पत्रपरिषदेत दिली.केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अमरावती महापालिकेचा समावेश न झाल्याने दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र शासनाने २५ ते ३० जून दरम्यान फेरप्रस्ताव मागितले होते. त्यानुसार जुन्याच आलिया या एजंसीने हा फेरप्रस्ताव बनविला आहे. पहिल्या फेजमधील प्रस्ताव तब्बल ५५०० कोटी रुपयांचा होता. प्रकल्प किंमत निम्म्यावर आणून आणि त्यात ‘रेट्रोफिटिंग’ ही नवीन प्रणाली समाविष्ट करण्याचे महत्कार्य आलिया कंपनीने केले आहे. अमरावती शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात हा समावेश असावा, याबबतचा ऊहापोह फेरप्रस्तावात करण्यात आला आहे. सुमारे ११०० एकर जागेवर अमरावती शहरासह स्मार्ट सिटी बनविण्याचे नियोजन असून त्यासाठी २२६८ रुपयांचा निधी लागू शकतो, असा अंदाज महापालिकेच्यावतीने या फेरप्रस्तावाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या २० शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली त्या शहरांचे डिपीआर अभ्यासण्यात आले. लोकसहभागही घेण्यात आला व त्यानंतर सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती आलिया कंपनीतर्फे देण्यात आली.(प्रतिनिधी)काय असेल स्मार्ट सिटी?कृषी आधारित उद्योगावर आधारित अर्थव्यवस्था, २० हजार नव्या नोकऱ्या आणि पाच ते दहा वर्षात १० हजार नवीन घरे, टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट सेंटर, अॅग्रोटेक व इन्फरमेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीसाठी कॅपासिटी बिल्डींग, शाळा, फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट.स्मार्ट सिटीची वैशिष्ट्येछत्रीतलावनजीक ३५० एकर जागेवर ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट केली जाणार आहे. रेट्रोफिटिंगमध्ये यशोदानगर ते दस्तुरनगर या विद्यमान भागाचा विकास करून स्मार्ट सिटीचे ध्येय गाठले जाणार आहे. स्मार्टसिटीच्या फेर प्रस्तावात ‘रिडेव्हलपमेंट’ ही बाबही अंतर्भूत करण्यात आली आहे. पॅनसिटी मॉडेल्समध्ये स्मार्ट सोल्युशन व नवतंत्रज्ञानाचा वापर अपेक्षित आहे. वॉटरसप्लाय, इलेक्ट्रीसिटी, ट्रान्सपोर्ट अॅन्ड मोबिलिटी, सिसीटीव्ही, सोलर, हाऊसिंग याशिवाय महापालिकेतील सर्व सेवा आॅनलाईन होतील.
स्मार्ट सिटीच्या स्वप्नपूर्तीसाठी २,२६८ कोटींचा ‘डीपीआर’
By admin | Updated: June 26, 2016 00:09 IST