शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी श्रमाला रक्तदानाची जोड

By admin | Updated: May 18, 2017 00:26 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी वरूड तालुक्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून श्रमदानासाठी हजारो हात सरसावले आहेत.

बेनोड्यात राबले शेकडो हात : महसूल प्रशासनाचा पुढाकार, ‘वॉटर कप स्पर्धा’लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : दुष्काळावर मात करण्यासाठी वरूड तालुक्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून श्रमदानासाठी हजारो हात सरसावले आहेत. तालुक्यातील बेनोडा येथे दुष्काळावर मात करण्याचा निर्धार करीत नागरिकांनी श्रमदानासह रक्तदानही केले. पाणी फाऊंडेशनच्यावतीने ४५ दिवसांची ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ राबविली जात आहे. स्पर्धेसाठी वरूड तालुक्याची निवड करण्यात आली असून विविध ठिकाणी जलयुक्त शिवार योजना राबविली जात आहे. बेनोडा (शहीद) येथे महसूल विभागाच्यावतीने महाश्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात महसूलसोबतच हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. याउपक्रमात जिल्हाधिकारी, कार्यालयातील अधिकारी, सर्र्व तहसीलदार, महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियान राज्यात सुरू आहे. यामाध्यमातून भूजल स्तर वाढविण्याचे प्रयत्न आहेत. सीसीटी, बंधारे, गावतलाव, शोषखड्डयांसह जलव्यवस्थापन आणि नियोजनावर भर देण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर उपविभागिय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार आशिष बिजवल, निवासी नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, गटविकास अधिकारी सतीश बुधे, सहायक गटविकास अधिकारी सुभाष बोपटे तसेच तलाठी, ग्रामसेवक सहभागी झाले. महिला, पुरुष, सेवाभावी संस्थाचे पदाधिकाऱ्यांनी श्रमदानातून उपक्रमास हातभार लावण्याचे कार्य जोमाने सुरू केले आहे. पाणी आणि रक्त तयार करता येत नाहीमहाश्रमदानासोबतच ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. शिबीरात श्रमदानानंतर अनेक महसूल अधिकारी, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. पाणी आणि रक्त दोन्ही घटक कुठेच तयार होत नसल्याने श्रमदानासोबतच रक्तदानाचे महत्त्व सुद्धा तितकेच असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.