शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅसची होणार ‘व्हॉट्स अप’वर नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 00:05 IST

घरगुती गॅस मिळण्यासाठी आता तासन्तास रांगेत उभे राहण्याचा वनवास संपला आहे.

दिलासा : रांगेत उभे राहण्याचा वनवास संपलालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घरगुती गॅस मिळण्यासाठी आता तासन्तास रांगेत उभे राहण्याचा वनवास संपला आहे. ज्यांच्याकडे अ‍ॅण्ड्राईड मोबाईल असेल अशा ग्राहकांना ‘व्हॉट्स अप’ वर स्वयंपाकाच्या गॅसची नोंदणी करता येणार आहे. केंद्र सरकारने ही सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला असून बहुतांश ग्राहकांना घरी बसूनच गॅसची नोंदणी करता येणार आहे.केंद्र सरकारने गरीब, सामान्यांना स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून दिला आहे. स्वयंपाकासाठी गॅस ही बाब स्वप्नवत वाटणारी असली तरी अनेकांच्या घरी गॅस कनेक्शन आले आहे. मोबाईल सतत हाताळल्या जाणाऱ्या ‘व्हॉट्स अप’वर घरगुती गॅस मिळविता येणार आहे. यापूर्वी फोनवर अथवा एसएमएसवर गॅस नोंदणी करता येत होती. केंद्र सरकारने ‘व्हॉट्स अप’ ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेकांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. मोबाईल ग्राहक हे सर्वाधिक ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा वापर करीत असल्याने पेट्रोलियम मंत्रालयाने सोशल मीडियाच्या वापर होणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर गॅस नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गॅस वितरकांना सूचनादेखील करण्यात आलेल्या आहेत. व्हॉट्स अ‍ॅप गॅस नोंदणी हा उपक्रम चांगला आहे. या उपक्रमातून मनुष्यबळही कमी लागते. ग्राहकांना चुटकीसरशी गॅस नोंदणी करता येईल.- रामेश्वर अभ्यंकर,गॅस वितरक, अमरावती