१५ जखमी : फ्रीजचे कॉम्प्रेसरही फुटले तळेगाव दशासर : घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने रेफ्रिजरेटरमधील रेग्युलेटरचाही स्फोट झाला. या अपघातात १५ जण जखमी झालेत. ही घटना नजीकच्या शेंदूरजना खुर्द येथील रमेश नारायण लांडे यांच्या घरी २२ सप्टेंबरच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. सर्व जखमींना चांदूररेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रमेश लांडे यांच्याकडे महालक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्ताने पाहुण्यांची गर्दी होती. मंगळवारी रात्री स्वयंपाक आटोपल्यानंतर दुसऱ्या शेगडीला सिलिंडरचे रेग्युलेटर लावण्याच्या प्रयत्नात सिलिंडरमधून गॅस वेगात बाहेर पडू लागला. देवघरात दिवा तेवत असल्याने गॅसचा भडका उडाला. यामुळे घरातील कपडे, साहित्याने पेट घेतला. लांडे कुटुंबात गोंधळ उडाला. यावेळी घरात उपस्थित रमेश नारायण लांडे, शोभा रमेश लांडे, सुनील रमेश लांडे, सुनीता सुनील लांंडे, नीता सुनील लांडे, चंद्रशेखर रमेश लांडे, ममता चंद्रशेखर लांडे, प्रसन्न सुनील लांडे, सृष्टी चंद्रशेखर लांडे, सुभद्राबाई अंंभोरे, दुर्गाबाई विनायक चौधरी, सोहन घाटे, आशा रामकृष्ण खंडागळे, किरण राजेश खंडागळे, राधा राजेश खंंडागळे, शाम राजेश खंडागळे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, धामणगावचे तहसीलदार प्रदीप शेलार, अशोक भंसाली, ठाणेदार नितनवरे, सरपंच वंदना देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर )
शेंदूरजना खुर्द येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट
By admin | Updated: September 24, 2015 00:12 IST