शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

निराधार महिलेचे दिवाळीपूर्वी अभ्यंग स्रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 00:26 IST

दिवाळी सणाचा आनंद अनाथ आणि वंचितांना घेता यावा, म्हणून दोन तरुणांनी पुढाकार घेतला. एका निराधार महिलेला दिवाळीपूर्वी अभ्यंग स्नान घालून

माणुसकीचे दर्शन : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखलवैभव बाबरेकर अमरावतीदिवाळी सणाचा आनंद अनाथ आणि वंचितांना घेता यावा, म्हणून दोन तरुणांनी पुढाकार घेतला. एका निराधार महिलेला दिवाळीपूर्वी अभ्यंग स्नान घालून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. त्या महिलेला नवे कपडे देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. संपूर्ण बाजारपेठ दिवाळीच्या खरेदीने गजबजली असून दोन तरुणांची नजर एका निराधार महिलेवर स्थिरावली. शुक्रवारी इर्विन चौकातील नर्र्सिंग वसतिगृहासमोर ४० वर्षे वयोगटातील एक महिला त्यांच्या नजरेस पडली. चार दिवसांपासून ती त्याच ठिकाणी अत्यवस्थेत होती. या मार्गावरून रोज शेकडो-हजारो नागरिक ये-जा करतात. लक्ष जावे, अशीच त्या महिलेची विदारक अवस्था होती. मात्र, आपल्याला काय त्याचे, असा भाव व्यक्त करीत अनेकजण पुढील प्रवासाला रवाना होत होते. ती महिला तशीच अत्यवस्थ पडून राहिली. त्यांच्याजवळ माशाही घोंगावत होत्या. तिच्यापर्यंत जाऊन तिची चौकशी करणे, तिला खायला देण्याचे सौजन्य कोणी दाखविले नाही. मात्र, शहरातील गोपाल तुरुक (पाटील) व नितीन अवसरमोल या तरुणांनी तिच्या व्यथा जाणून घेतल्या. या तरुणांची सह्यदयता पाहून त्या महिलेनेही साद दिली. सुनीता सुरेशे अशी नामओळख सांगून आपण अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असल्याचे तिने सांगितले. कुटुंबात कोणीही आपुलकीचे नसल्याने आपली ही अवस्था झाल्याची आपबिती तिने कथन केली. त्यानंतर दोन्ही तरुणांनी तिला पाणी पाजून चहा बिस्कीट खायला दिले. तरीही द्रवले नाही त्यांचे मनअमरावती : आपुलकीचे नसल्याने आपली ही अवस्था झाल्याची आपबिती तिने कथन केली. त्यानंतर तिला पाणी पाजून चहा बिस्कीट खायला दिले. तिच्या अंगावरील अस्वच्छ कपडे आणि तिची विदारक अवस्था पाहून गोपाल व नितीन यांनी तिला अभ्यंग स्रान घातले. त्या तरुणांची सह्यदयता पाहून दिवाळीपूर्वीच आपल्याला अभ्यंग स्नान अनुभवता आले, अशी प्रांजळ प्रतिक्रिया त्या महिलेने व्यक्त केली. त्यांनी या महिलेला साडीचोळी केली. मात्र, त्या महिलेला नवीन कपडे घालून कोण देणार, असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे त्यांनी काही महिलांकडे विनवणी केली. मात्र या दोन तरुणांव्यतिरिक्त कुणाचेही मन द्रवले नाही. दरम्यान सुर्यास्त झाल्याने त्या महिलेनेच स्वतच ते नवे वस्त्र परिधान करून तो प्रश्न सोडविला. पुढील मदतीसाठी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. दिगांबर वाघ व संग्राम नाईक या पोलिसांच्या मदतीने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.