शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला भेटण्याच्या बहाण्याने घटस्फोटित पत्नीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:08 IST

अमरावती : मुलीला भेटण्याचा बहाणा करून पतीने घटस्फोटित पत्नीशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. ही ...

अमरावती : मुलीला भेटण्याचा बहाणा करून पतीने घटस्फोटित पत्नीशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. ही धक्कादायक घटना राजापेठ हद्दीतील कंवरनगरात ३० एप्रिल रोजी उघडकीस आली. ३५ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी प्रशांत उर्मीलेश सिंग (वय ४०, रा. ढत्तरपल्ली, बेनाचिटी दुर्गापूर, जि. बुरर्दबान, राज्य पश्चिम बंगाल) याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला. पोलीस सूत्रानुसार, पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचे २३ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रशांत सिंग याच्याशी वैदिक पध्दतीने पुणे येथे लग्न झाले. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. आता ती चार वर्षांची आहे. परंतु, आपसी वादामुळे त्यांनी २०१७ मध्ये न्यायालयातून घटस्फोट घेतला. त्यानंतर १५ जून २०१९ राजी प्रशांत सिंग हा मुलीला भेटण्यासाठी पत्नीच्या घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी रेल्वे असल्यामुळे पूर्वाश्रमीचा पती घरीच थांबला. दरम्यान, रात्रीच्या वेळेत प्रशांत पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने तिच्याशी लगट साधण्याचे प्रयत्न केला. परंतु, पत्नीने धक्का देऊन प्रशांतला दूर सारले. त्यावेळी प्रशांतने पत्नीला तिचे काही अश्लील छायाचित्रे दाखवून तिला शरीरसुखाची मागणी केली आणि छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रशांतने पत्नीशी जबरीने शारीरिक संबंध व अनैसर्गिक कृत्य केले. ही बाब कुणाला सांगितली तर मुलीला जिवे मारण्याचीही धमकीही दिली. या घटनेची तक्रार पीडित महिलेने ३० एप्रिल रोजी राजापेठ पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी प्रशांत सिंगविरुध्द भादंविची कलम ३७६(ब),३७७,५०६(ब) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.