शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

जिल्हा परिषद शाळेत गंभीर प्रश्नांच्या भडीमाराने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:30 IST

स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शनिवारी पालक-शिक्षकांची विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचत पालकांनी गोंधळ घातला. सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्राचार्य अशोकराव इंगळे यांनी पालकांना दिले.

ठळक मुद्दे१० वी, १२ वीला शिक्षक नाही : दोन महिन्यांपासून स्थिती गंभीर, विद्यार्थी वाऱ्यावर, पालक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शनिवारी पालक-शिक्षकांची विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचत पालकांनी गोंधळ घातला. सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्राचार्य अशोकराव इंगळे यांनी पालकांना दिले.राज्य शासनाने विशेष आदेशाने शाळेतील विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला या गंभीर आजाराची लस प्रत्येक विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी विशेष पालकसभेचे आयोजन केले होते. पालकांबाबत या लसी योजनेची जागृती व्हावी, यासाठी सर्व पालकांना आमंत्रित केले होते. आरोग्य विषयाबाबतीत ४० मिनिटांचा विषय संपताच पालकांनी जि. प. शाळेतील गंभीर तक्रारींचा पाढाच वाचला. यावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा जि. प. चे प्राचार्य इंगळे यांनी सर्व पालकांनी एका एकानी प्रश्न व नाव सांगावे, गोंधळ करू नये, असे बजावताच प्रत्येक पालकांनी गंभीर विषयाला घात घातला. मोहोड, पांडूरंग डोंगरे, सारिका यादव, मुकुंदराव यादव, चेतना तायडे यांनी विविध विषयाची सरबत्ती केली. यात ९ वी, १० वीचा गणित विषयाचा दोन महिन्यांपासून पिरीयड होत नाही. १० वी, १२ वीला केमिस्ट्री, बॉयलॉजी, गणिताचे तीन शिक्षक नाही. वर्ग ६ ते ८ ला दोन शिक्षक नाही, असे पाच शिक्षक कमी असणे ही बाब गंभीर आहे. तसेच १० वी, १२ वीचे विज्ञानाचे प्रॅक्टीकल दोन महिन्यापासून बंद आहे. विशेष प्रवर्गाला विद्यार्थ्यांना अनुदान असता खुला वर्गातील विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्याची सक्ती १० वी, १२ वी शिक्षण शिकविण्याचे बोर्ड डिजीटल नसल्याने साधे बोर्डावरचे शिक्षकाचे लेखी काम विद्यार्थ्यांना स्पष्टपणे दिसत नाही. आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही. या मुद्यावरून पालकसभेत गदारोळ झाला. शाळा व्यवस्थापन समितीबाबत पुढील कार्यवाही केली किंवा नाही, असेही प्रश्न विचारण्यात आले. शाळेत शिक्षक गृहपाठ देत नाही. दिले तर त्याची तपासणी होत नाही, अशा विविध मुद्यांनी सभेत गरमागरमी होत होती. मनुष्यबळाचा अभाव व शाळेला तटरक्षक भिंत नसल्याने शाळेसमोर विविध समस्या आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो, असे प्राचार्य इंगळे यांनी म्हणाले. सभेला १२३ पालक उपस्थित होते. त्यात ८२ महिला पालकांचा समावेश होता. महिला पालकांनीच प्रश्नांची सरबत्ती केली.शाळेवर शिक्षण विभागाचा अंकुश नाहीजिल्हा परिषद शाळेवर शिक्षण विभागाचा अंकुश नसल्याने वरिष्ठ अधिकारी असतानादेखील कोणताही अधिकारी शाळेला भेट देत नसल्याची चर्चा पालकात दिसून आली.