शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

युवा क्रांती दलाचे जिल्हा कचेरीवर धरणे

By admin | Updated: April 10, 2015 00:30 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये, या मागणीसाठी गुरूवारी आदिवासी युवा क्रांती दलाने जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले.

अमरावती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये, या मागणीसाठी गुरूवारी आदिवासी युवा क्रांती दलाने जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले. यावेळी कर्त्यानी मागणीचे निवेदन जिल्हाजिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सोपविले.सद्यस्थितीत राज्यात आदिवासींच्या अनुसूचित जमाती (एस टी) आरक्षण धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्यासाठी प्रथम धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत घटनेच्या अनुच्छेद ३४२ (२) प्रमाणे समाविष्ट करावे लागेल त्या शिवाय आदिवासीना असलेले आरक्षण त्यांना मिळणार नाही. तसेच एखाद्या जातीचा एसटी प्रवर्गात समावेश करणे अथवा दुरूस्ती यासंबंधी केंद्र शासनाने जून १९६६ ला कार्यपध्दती विहित केली आहे. त्यानंतर २००२ मध्ये त्यात दुरूस्ती केली आहे. या कार्यपद्धती प्रमाणे जे दावे राज्य सरकार, रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय अनूसुचित जमाती आयोग या तिघांनी शिफारस केली असता असे दावेच मसुदा समितीत मांडले जातात. संसदेने विधेयक पारीत केल्याशिवाय अनूसुचित जमातीच्या यादीत वगळणे व दुरूस्ती होऊ शकत नाही, असे आदिवासी युवा क्रांती दलाने या निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकार अथवा रजिस्ट्रार जनरल यांनी केलेले दावे अनुसूचित जमाती आयोग फेटाळू शकतात. शिफारसी जर निकषांना धरून नसेल तर धनगर आणि इतर जाती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केलेले निकष पूर्ण करीत नाही. म्हणून संसदेने २००२ साली विधेयक फेटाळले होते. तसेच संसदेने धनगड व धनगर वेगळे असल्याचे मान्य करून अनुसूचित जमातीच्या यादीत २००२ मध्ये दुरूस्ती करण्याला संमती दिलेली नाही. या सर्व प्रार्श्र्वभूमीवर अनुसूचित जमातीमध्ये नवीन जातीचा समावेश करू नये अशी मागणी आदिवासी युवा क्रांती दलाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. आंदोलनात राजू मसराम, रामेश्र्वर युवनाते, शालीकराम मानक र, प्राची आत्राम, संजय मसराम, सुखदेव सोळंके, शोभा उईके, सीमा मरकाम, विवेक युवनाते, रामेश्र्वर उईके आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)