शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा हिवताप कार्यालय आजारी

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

जिल्हा हिवताप कार्यालय सद्यस्थितीत अनेक समस्यांनी ग्रस्त असून मंगळवारी दुपारी १.१५ वाजता दरम्यान या कार्यालयाला भेट दिली असता ...

अधिकारी बेपत्ता : चार वर्षांपासून पाणीच नाहीसंदीप मानकर अमरावतीजिल्हा हिवताप कार्यालय सद्यस्थितीत अनेक समस्यांनी ग्रस्त असून मंगळवारी दुपारी १.१५ वाजता दरम्यान या कार्यालयाला भेट दिली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी, कर्मचारी गायब होते. मागील चार वर्षांपासून या कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. जिल्हा हिवताप अधिकारी प्रदीप लव्हाळे न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात बाहेर गेल्याचे सांगण्यात आले, तर जिल्हा हिवताप पर्यवेक्षक ज्ञानेश्वर डोंगरे, सहायक अधिकारी सी.आर.मुंदरे आदी अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे येथील कनिष्ठ लिपिक आस्थापना बी.एल.वानखडे हे रजेवर असल्याचे सांगण्यात आले. हे कार्यालय अनेक समस्यांनी ग्रस्त असून कार्यालयाच्या फलकावर अनेक दिवसांपासून पालापाचोळा साचला आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दुचाकी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराच्या आत लावल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर कार्यालयाच्या बेसिन्समध्ये घाण साचली आहे. शौचालय व प्रसाधनगृहांचीदेखील दुरवस्था झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून हिवताप निर्मूलनाची जबाबदारी, या कार्यालयावर आहे. परंतु हे कार्यालयाच आजारी असल्याने दाद कुणाकडे मागावी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक कर्मचारी लेटलतीफयेथे २२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश लेटलतीफ असतात. त्यामुळे तालुका पातळीवरून कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. मंगळवारी या कार्यालयात अगदी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याची सोयही नाहीविभागीय प्रशिक्षण कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधला होता. त्यावेळी खोदकाम करताना हिवताप कार्यालयाचे नळ कनेक्शन कापण्यात आले होते. तेव्हापासून येथील पाणीपुरवठा बंद आहे. येथे जिल्हा कुष्ठरोग कार्यालय, हत्तीरोग कार्यालय व हिवताप कार्यालय आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही.