शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
4
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
5
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
6
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
7
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
8
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
9
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
10
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
11
केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 
12
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
13
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
14
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
15
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
16
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
17
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
19
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
20
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

जिल्हा भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

देवगाव चौफुली येथे भाजपचे रास्ता रोको धामणगाव रेल्वे : ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याचा मागणीसाठी भाजपच्यावतीने शनिवारी देवगाव चौफुली ...

देवगाव चौफुली येथे भाजपचे रास्ता रोको

धामणगाव रेल्वे : ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याचा मागणीसाठी भाजपच्यावतीने शनिवारी देवगाव चौफुली येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतूक खोळंबली होती.

आमदार प्रताप अडसड, बाळासाहेब शिरपूरकर, पंचायत समिती सदस्य नरेंद्र रामावत व राजकुमार केला, सुनील साकोरे, नितीन मेंडुले, रवि जिचकार, नलिनी मेश्राम, दीपाली मानकर, विशाल जयस्वाल, विनोद धुवे, पद्माकर पाटील, अनुराग मुळे, रत्नमाला पोळ, अर्चना ठाकरे, अर्चना गोडबोले, श्याम घाटे, गिरीश भुतडा, सीमा देवतळे, मनोज डहाके, बबलू बिरे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

-

-------------

फोटो पी २६ भातकुली

दर्यापूर-परतवाडा मार्ग रोखला, वाहतूक ठप्प,

टाकरखेडा संभू (भातकुली) : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात वलगाव टी-पाॅईंटवर शेकडो कार्यकर्त्यांनी चक्काजाम केला. यामुळे दर्यापूर-परतवाडा मार्गावरील वाहने तब्बल एक तास ठप्प झाली होती. माजी तालुकाध्यक्ष सोपान गुडधे, मामासाहेब निर्मळ, विकास देशमुख, अजिंक्य वानखडे, श्याम गवळी, अंकुश सावरकर, कुलदीप निर्मळ, पंकज यादगिरे, सवेंद्र चक्रे सहभागी झाले.

-------------

फोटो पी २६

तिवसा शहरात भाजपचे चक्काजाम आंदोलन

तिवसा : शहरातील पेट्रोल पंप चौकात भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नीलेश श्रीखंडे, शंतनू देशमुख, मिलिंद देशमुख, श्रीकांत कांडलकर, सागर शिंगणे, प्रवीण भोजने, शेखर भातकुले, दिनेश वानखडे, भूषण देशमुख, स्वप्निल भुयार, राजू नेवारे, प्रमोद मानपुरे, राहुल थोटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते.

-------------

फोटो पी २६ अचलपूर

अचलपुरात चक्काजाम

अचलपूर : भारतीय जनता पार्टी अचलपूर शहर मंडळाच्यावतीने ओबीसी आरक्षण वाचविण्याच्या मुद्द्यावर विदर्भ मिल चौकात चक्काजाम करण्यात आला. भाजपचे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गजानन कोल्हे यांच्या उपस्थितीत व मंडळ अध्यक्ष अभय माथने यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.

जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे, प्रताप अभ्यंकर, नानासाहेब बोबडे, शशिकांत जैसवाल, राजन जैस्वाल, धर्मा राऊत, प्रवीण तोडगावकर, सोहन खोलपुरे, सुमीत चौधरी, गजानन शर्मा, शंकर बाशानी, राजेश सुंडेवाले, गौरीशंकर नंदवंशी, महेश कडू, स्वप्निल बोबडे, संदीप नाथे, योगेश थोरात सहभागी झाले.

-------------