शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या ८८ शाखांची सेवा ठप्प

By admin | Updated: May 12, 2015 00:19 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संघटनेव्दारा सोमवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार ...

६०० कर्मचारी संपावर : रोखलेल्या वेतनवाढीसह महागाई भत्ता हवाचअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संघटनेव्दारा सोमवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासल्याने जिल्हा बँकेच्या ८८ शाखांचे कामकाज बंद पडले आहे. दररोजची ३५ कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ईतर घटकांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६०० कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. बँकेच्या व्यवस्थापनाने २०११ पासून कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले महागाई भत्ते दिलेले नाहीत. संघटनेनी मागण्यांसाठी पाठपुरावा केला असता, बँकेच्या व्यवस्थापनाने दिलेला शब्द पाळला नाही. चार वर्षांपासून बँक नफ्यात असताना आर्थिक स्थिती नसल्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांना भत्ता नाकारला गेला. व्यवस्थापनाचे कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरली आहे. या संपात सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने बँकेच्या सर्वच शाखा बंद आहेत. महागाई भत्ते रोखल्यामुळे कर्मचारी गेल्या चार वर्षांपासून आर्थिक कोंडीत सापडले असून मुलांच्या वाढत्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, असा सवाल महिला कर्मचाऱ्यांनी केला.बँकेच्या व्यवस्थापनाचे कर्मचारी विरोधी धोरण आहे. त्यामुळे कर्मचारी संतापले आहेत. हा अन्याय सहन करणार नाही. आता माघार नाहीच, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहील.- प्रभाकर किलोर, प्रमुख कार्यवाह, कर्मचारी संघटना. जिल्हा बँकेचे व्यवस्थापन मंडळ व सीईओ यांनी कर्मचारी संघटनेसोबत समोरासमोर चर्चा करुन तोडगा काढावा. याबाबत तीन दिवसांपूर्वीच कळविले आहे. सोमवारीदेखील बोलणे झाले आहे. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकरीहित महत्त्वाचे आहे. शिस्तप्रिय व्यवस्थापनाने बँकेला नफ्यात आणले. कर्मचाऱ्यांच्या वेतनात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. परंतु काही पदाधिकारी असंतुष्ट असतात. या चर्चेतून काही निष्पन्न होणे नाही. हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. - बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक