शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाला लागले प्रभारी अधिकाऱ्यांचे ग्रहण

By admin | Updated: April 8, 2015 00:22 IST

जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय कार्य सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात सद्या प्रभारी अधिकाऱ्यांचे ग्रहण मोठे लागले आहे.

अनुशेष : निवृत्ती, प्रतिनियुक्ती आणि बदली प्रक्रियेचा फटकाअमरावती : जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय कार्य सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात सद्या प्रभारी अधिकाऱ्यांचे ग्रहण मोठे लागले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती, बदली आणि प्रतिनियुक्ती यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेली प्रमुख अधिकाऱ्यांची पदे सद्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर सुरू आहेत. जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांसह काही पदे अशी आहेत की या ठिकाणी प्रशासकीय कामकाजासाठी पूर्णवेळ अधिकारी असणे आवश्यक आहे. यापैकी सध्या जिल्हा प्रशासनातील सहा प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या पदांची अतिरिक्त जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मुळ पदस्थापना असलेल्या अधिकाऱ्यांना अन्य विभागाची कामे करावी लागत आहेत. जिल्हा परिषदेनंतर आता रिक्त पदाच्या बाबतीत आता जिल्हाधिकारी कार्यालयाचा नंबर रिक्त पदांमध्ये लागला आहे. राज्यातील युती शासनाने सत्तेत येता पहिल्यांदा अमरावतीसह विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्याचे सुतोवाच केले आहे. मात्र याला सहा महिन्याचा अवधी होऊनही अद्यापपर्यंत शासकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरलेली नाहीत. परिणामी रिक्त पदे व प्रभारी अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कामकाजाचा वाढलेला ताण याचा विपरित परिणाम विविध कामकाजावर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त असलेली अधिकाऱ्यांची पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री असतानाही प्रशासकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरली जात नाही तर दुसरीकडे विदर्भात नियुक्ती करून पाठविलेले मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी बदलीनंतर नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होत ंंनाहीत (प्रतिनिधी)हे आहेत प्रभारी अधिकारीराम सिद्धभट्टी - अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा प्रभारविनोद शिरभाते - मुळ पदस्थापना भूसंपादन अधिकारी, भूसंपादन अधिकारी वर्ग २ चा प्रभार, खनीकर्म अधिकारी प्रभार.मोहन पातूरकर - भूसंपादन विभागात पदस्थापना आहे. याशिवाय निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा प्रभार, जिल्हा निवडणूक अधिकारी व ग्रामपंचायत विभागाचा प्रभार.जिल्हा परिषदेतही रिक्त पदेजिल्हा परिषदेत मागील दोन वर्षापासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी २ पदे रिक्त आहेत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली जात नाही प्रभारी्य ग्रहण लागले आहे.हे आहेत प्रतिनियुक्तीवरतेजूसिंग पवार - आरडीसी आहेत ते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे स्वीय सहायक आहेत.रवींद्र धुरजड - निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी. पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती.अनिल भटकर - नझुल तहसीलदार आहेत. पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत.किशोर कामुने - ३१ मार्चला सेवानिवृत्त ाले आहेत.