शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी कर्ज वितरण करा

By admin | Updated: May 24, 2017 00:11 IST

खरीप कर्जपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील पात्र १ लाख २३हजार शेतक-यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे,

आढावा बैठक : बँक अधिकाऱ्यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप कर्जपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील पात्र १ लाख २३हजार शेतक-यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे, तसेच कमी रकमेच्या थकबाकीदारांना जुने कर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करुन पतपुरवठ्यात सहभागी करुन घ्यावे. शेतक-यांची पेरणीची गरज लक्षात घेता कृषी, महसूल विभाग व बँकांनी समन्वयातून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोट यांनी आज येथे दिले.खरीप पीक कर्ज वितरणाविषयी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्यासह कृषी विभाग व कर्ज वितरण करणाऱ्या सर्व बँकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.एकही गरजू शेतकरी पतपुरवठ्यापासून वंचित राहता कामा नये. थकबाकीदारांचेही कर्जाच्या रकमेनुसार वर्गीकरण करावे.पात्र शेतकऱ्यांना कर्ज तत्काळ देतानाच ५० हजारांहून कमी रकमेच्या थकबाकीदारांनाही जुने कर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे. अनुकुलता दर्शविणाऱ्यांना नवीन कर्जप्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, जेणेकरून खरीप हंगामात पीक घेण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होईल. तूर पिकाचे चुकारे लवकरच होणार आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी त्याद्वारे कर्ज फेडू शकतील. ही शक्यता लक्षात घेता त्यांना प्रोत्स्आाहित करून नवीन कर्जपुरवठा करता येणे शक्य आहे. याशिवाय प्रलंबित प्रकरणांत नवीन कर्ज देताना जुन्या कर्जाची रक्कम वसूल करता येणे शक्य आहे का, हेही तपासावे जेणेकरुन अनुत्पादक कर्जाचे प्रमाणही कमी होईल, असे प्रवीण पोटे म्हणाले.पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांना द्यावीज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोझा नाही, त्यांची यादी करून बँकांना उपलब्ध करून द्यावी. गावोगावच्या तलाठ्यांना अशी माहिती तत्काळ देण्यात यावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. बँकांनी आपल्या शाखेत कर्जवितरणाची माहिती मिळण्यासाठी कक्ष स्थापन करावा. अर्जदारांना सौजन्यपूर्वक माहिती द्यावी. ठिकठिकाणी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करतानाच वन- टू-वन फॉलोअपही घ्यावा. कॅम्पमध्ये तलाठ्यांचाही समावेश केला जाईल. खासगी बँकांनीही त्यांची जबाबदारी टाळू नये. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. प्रत्येक बँकेने कर्जवितरणाबाबत दर शुक्रवारी माहिती द्यावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.