शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना !

By admin | Updated: July 28, 2016 00:11 IST

महापालिकेच्या बांधकाम विभागात कंत्राटी सेवा देणाऱ्या अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशाची अवमानना चालविली आहे.

अभियंत्यांचा बांधकाम विभागात मुक्काम : पदमुक्ततेनंतरही हाताळताहेत कामकाज अमरावती : महापालिकेच्या बांधकाम विभागात कंत्राटी सेवा देणाऱ्या अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशाची अवमानना चालविली आहे. अतिरिक्त उपअभियंता म्हणून सेवा देणारे दोन कंत्राटी अभियंते आजही बांधकाम विभागातच मुक्काम ठोकून आहेत. या प्रकरणाबाबत बांधकाम विभागातील विद्यमान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कार्यमुक्त केल्यानंतर व पुनर्नियुक्तीचे कुठलेही आदेश नसताना एस. पी. देशमुख व अन्य अभियंते फाईल्स कसे हाताळू शकतात, असा त्यांचा रास्त सवाल आहे. पदमुक्ततेच्या आदेशानंतरही कॅबिन न सोडणाऱ्या अभियंत्याविरुद्ध विभागातच असंतोष खदखदू लागला आहे. त्यांनी आयुक्तांच्या आदेशाची अवमानना चालवली असली तरी त्यांना वरिष्ठांचेच अभय असल्याचा आरोपही होत आहे. २७ सेवानिवृत्तांपैकी २६ जणांना कार्यमुक्त केल्यानंतर बहुतांश जणांनी आपला पदभार विभाग प्रमुखांकडे सोपवून महापालिकेच्या कामातून स्वत:ला अलिप्त केले आहे. त्या पार्श्वभूमिवर नोकरी सोडल्यानंतर किंवा संबंधित कार्यप्रमुखांनी पदमुक्त केल्यानंतर कुणी कुठल्याही नियमान्वये पुन्हा येवून तेच काम कसे करू शकतो, फाईली कसे हाताळू शकतो, कंत्राटदारांशी अर्थपूर्ण बोलणी कशी करू शकतो, अशा एक ना अनेक सवालांनी बांधकाम विभागाला घेरले आहे. नियमांचे भोक्ते आणि पॉझिटिव्ह दृष्टीकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुक्तांच्या अपरोक्ष या कार्यमुक्त अभियंत्यांनी बांधकाम विभागात बैठक मांडली आहे. कदाचित आयुक्तांना हे माहित नसावे, अशी शक्यता आहे. मात्र एस. पी. देशमुख कार्यमुक्ततेनंतरही बैठकीला हजर राहतात. ही बाब अदखलपात्र नसल्याने आयुक्तांनीच या प्रकरणात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)४० हजारांच्या मर्यादेचा त्राससेवानिवृत्त शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची विहित कार्यपद्धतीचे पालन करून करार पद्धतीने नेमणूक करावयाची आहे. अशांना सेवानिवृत्तीपूर्वी मिळत असलेल्या एकूण वेतनातून त्यांना आता मिळत असलेले निवृत्तीवेतन वजा केल्यानंतर होणारी रक्कम त्यांचे मासिक पारिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावे, अशा पारिश्रमिक रक्कमांची कमाल मर्यादा ४० हजारांच्या मर्यादेत असावी, अशी अट आहे. ही अट अनेकांना त्रासदायी ठरणार आहे. ७५ हजारांपेक्षा अधिक मोबदला देणारे अभियंते ४० हजारांच्या मर्यादेत बांधिलकी जोपासून काम करतील का? याबाबत प्रशासनाला शंका आहे. नियुक्तीला हवी शासनमान्यताकरार पद्धतीने नियुक्ती करताना प्रस्तावास सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाच्या सहमतीची आवश्यकता असणार नाही. करार पद्धतीने नियुक्ती करावयाच्या प्रस्तवास शासनाची मान्यता संबंधित विभागाने घ्यावी, अशा सूचना आहेत.करार पद्धतीने नियुक्तीमुळे शासन सेवेत असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या पदोन्नतीच्या संधीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची दक्षता यंत्रणेला बाळगायची आहे. करार पद्धतीने नियुक्ती करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरुप, आकस्मिकता, सार्वजनिक हित याबाबी विचारात घेण्यात याव्यात, असे ८ जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयात सुचविले आहे. मुदतवाढ, पुनर्नियुक्ती नाहीचनियमाने वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छा सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुदतवाढ आणि पुनर्नियुक्ती देण्यात येवू नये, अशी अट शासन निर्णयात घालून देण्यात आली आहे. त्याचवेळी अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई सुरू किंवा प्रस्तावित नसल्याची खातरजमा प्रशासनाला करायची आहे.