शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

वनजमिनीवर ‘त्या’ खोदकामाबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

By admin | Updated: November 15, 2016 00:12 IST

बडनेरा वनवर्तुळांतर्गत सालोड ते कारंजा मार्गावर वनजमिनींवर पोकलँडने भूमिगत आॅप्टिकल फायबर केबल टाकले असताना...

सर्वेअरकडून होणार मोजणी : वनगुन्हे दाखल नंतर चौकशी अहवाल नाहीअमरावती : बडनेरा वनवर्तुळांतर्गत सालोड ते कारंजा मार्गावर वनजमिनींवर पोकलँडने भूमिगत आॅप्टिकल फायबर केबल टाकले असताना ते वनजमिनीवर टाकले अथवा नाही? हे शोधण्यासाठी वन विभाग भूमिअभिलेखच्या सर्वेअरकडून नव्याने मोजणी करणार आहे. तसे संकेत वनविभागाने दिले आहे. वनजमिनीवर खोदकाम झाल्याबाबत अधिकारी संभ्रमात असल्याचे चित्र आहे.वन अधिनियमानुसार वनजमिनीवर यंत्र अथवा मशीनद्वारे खोदकाम करता येत नाही. तरीदेखील खासगी कंपनीने वनजमिनीवर पाच कि. मी. पोकलँडने खोदकाम केल्याची बाब निदर्शनास आली. पोकलँडने वनजमिनीवर खोदकाम केल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वनगुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सिद्ध करता यावे, यासाठी आता भूमिअभिलेख विभागाच्या सर्वेअरकडून घटनास्थळाचे मोजमाप, खोदकाम झाल्याची जागा कुणाची आदी कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी वन विभाग सरसावला आहे. ३५ लाख रुपये किमतीचे पोकलँड ताब्यात घेऊन वनगुन्हे दाखल केल्यानंतरही वनाधिकाऱ्यांना खोदकाम कोणत्या यंत्रणेच्या मालकीत झाले. याबाबत संभ्रम कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वनजमिनीवर पोकलँडने खोदकाम प्रकरणाचा तपास डीएफओच्या आदेशाने वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र तांत्रिक कारणांमुळे चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर होत नसल्याची माहिती आहे. आता वनजमिनीवर खोदकामाचे सर्वेअरकडून मोजणी केली जाणार असून त्यानंतरच चौकशी अहवालाचा मार्ग सुकर होईल, असे बोलले जात आहे. एकिकडे वनगुन्हे दाखल करून पोकलँड ताब्यात घेण्याची कारवाई झाल्यानंतरही वनाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.काही तांत्रिक कारणांमुळे वनजमिनीवर खोदकाम केल्याप्रकरणी उशिरा वनगुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात कोणताही गैरप्रकार झाला नाही. खोदकाम झालेली जमीन ही कोणाच्या मालकीची हे तपासण्यासाठी शासकीय सर्वेअरकडून मोजणी केली जाईल. भविष्यात हे प्रकरण न्यायालयात टिकावे, यासाठी तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत.- हरिश्चंद्र पडगव्हाणकरवनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी