शेतकरी चिंतेत :
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील शेतकºयांची खरिपातील प्रत्येक हंगाम गार होत असल्याने अखेर तूर पिकावर मदार असताना अचानक आलेल्या मर रोगामुळे तुरीची झाड वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकºयांना यावर्षी अनेक संकटाचा सामना करावा लागला. तरीही शेतकºयांनी छातीवर दगड ठेवून उसनवारीवर सोयाबीन, कपाशीची पेरणी केली. सुरुवातीच्या काळात बोगस बियाणेने शेतकºयांचे कंबरडे मोडले. दुबार पेरणीनंतर पावसाने साथ दिली. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेंगा भरल्या नाही. जेमतेम आलेला सोयाबीन काढणीच्या ऐन वेळेत पावसाने तेही खराब झाले.कपाशीला बोंडअळीचा मार बसला. त्यामुळे रबीतील अखेरचे तूर या पिकावर अनेक महागडी औषधे फवारणी केल्याने तूर पीक जोमात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून झाडे वाळत असल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाल्याचे चित्र आहे.
परिसरात अनेक शेतकºयांनी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे घरचे बियाणे वापरले. त्यावर अनेक प्रकारची फवारणी करून अपेक्षित उत्पन्न घेण्याचे शेतकºयांनी ठरविले. तूर पीक जोमदार दिसत होते. त्यामुळे शेतकरी आनंदी होता. मात्र त्यावर नेमका कोणता रोग आला हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. तालुक्यात अनेक शेतकरी आपसात गप्पा करत असताना हा रोग तुरीवर आलेला मर रोग असावा, असे मत व्यक्त होत आहे.