दोन वेळा सभा स्थगित : साडेबारा कोटींच्या विकासकामांवर अखेर शिक्कामोर्तबअमरावती : अंतर्गत राजकारण, न्यायालयीन भानगडींमध्ये वर्षभरापासून अडकलेल्या बडनेरा मतदारसंघातील १२.५० कोटी रुपयांच्या विकासकामांवर अखेर महापालिकेच्या गोंधळात पार पडलेल्या आमसभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. विकासकामांच्या यादीला सभेत मंजुरी देताना सदस्यांमध्ये रंगलेल्या कलीगतुऱ्यानंतर या विकासकामांवर निर्णय घेण्यात आला. सदस्यांची कामे गटनेत्यांनी महापौरांकडे प्रथम सादर करावी, असे ठरविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर वंदना कंगाले यांच्या पीठासीनाखाली बुधवारी सर्वसाधारण सभा पार पडली. प्रदीप हिवसे यांनी संतापून यादी फाडलीबडनेरा मतदारसंघात १२.५० कोटी रुपयांतून करावयाच्या विकास कामांच्या यादीत समाविष्ट कामांची नावे बघून काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप हिवसेसुध्दा संतापले. त्यांनी उद्वेगाने हातात असलेली विकास कामांची यादी सभागृहात फाडून भिरकावली. अखेर जावेद मेमन यांनी त्यांची समजूत काढली.जावेद मेमन व सुनील काळे यांच्यात वाद१२.५० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या अनुदान वाटपावर शिक्कामोर्तब करताना सभा स्थगित करण्याच्या विषयावरुन संजय खोडके गटाचे सदस्य जावेद मेमन आणि राकाँचे सुनील काळे यांच्यात वाद झाला. मुस्लिम वस्त्यांमध्ये अनुदान वाटपात राजकारण होत असल्याचा आरोप जावेद मेमन यांनी केला. सुनील काळे सभा स्थगित करण्याच्या बाजूने असल्याने मेमन संतापले. सदस्यांनी मध्यस्थी के ली.
चर्चा, गोंधळ अन् निर्णय
By admin | Updated: August 13, 2014 23:33 IST