शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

दक्षता समितीची बैठक न घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: January 24, 2015 22:45 IST

दक्षता समितीची नियमित बैठक न घेतल्यास त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहे.

अमरावती : दक्षता समितीची नियमित बैठक न घेतल्यास त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जिवनावश्यक वस्तूवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने राज्यात दक्षता समित्या गठित केल्या आहेत. विविध स्तरावरील दक्षता समितींची बैठक प्रत्येक महिन्यात नियमितपणे घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे समितीची बैठक न घेणाऱ्या संबंधित सदस्य व सचिवाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून त्रैमासिक अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने ८ जानेवारीला संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यात ग्राम, तालुका, नगरपरिषद, महापालिका व जिल्हास्तर दक्षता समित्या गठित केल्या आहेत. दक्षता समितीची बैठक महिन्यातून एकदा घ्यावी तसेच दक्षता समितीच्या बैठका नियमितपणे घेण्याची संपूर्ण जबाबदारी समितीच्या सदस्य सचिवाची असते. जिल्हा स्तरावरील दक्षता समितीच्या अध्यक्षांना काही अपरिहार्य कारणामुळे शासनाने ठरवून दिलेल्या दिनांकास बैठक घेणे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी. सर्व स्तरावरील दक्षता समित्यांना त्यांच्या कार्यक्षेत्र अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारी संदर्भात आवश्यक कारवाई करून त्याबाबतचा त्रैमासिक अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)