शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा आगारातून बसमध्ये सहा महिन्यांपासून डिझेल भरणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:39 IST

एसटी आगाराचा डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद असल्याने या येथील बसेसमध्ये अमरावती आगारातून डिझेल भरावे लागत आहे.

ठळक मुद्देचालक त्रस्त : अमरावती आगारातून डिझेलचा भरणा

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : एसटी आगाराचा डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद असल्याने या येथील बसेसमध्ये अमरावती आगारातून डिझेल भरावे लागत आहे. यासाठी चालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. पर्यायाने आर्थिक नुकसानही वाढले आहे. आगार व्यवस्थापकाने याची दखल घ्यावी, असे चालकांमध्ये बोलले जात आहे.बडनेरा आगारातून मोठ्या संख्येत प्रवासी ये-जा करतात. या आगारातून ४२ बसेस धावतात. बीड, लातूर, छिंदवाडा, भोपाळ, नांदेड, बºहाणपूर व इतरही ठिकाणी बडनेºयाच्या आगारातून बसेस जातात. लांब पल्ल्याचा प्रवास आटोपल्यावर बडनेरा आगारातील चालकांना दुसºया दिवसासाठी अमरावती आगारातून डिझेल भरावे लागत आहे. सहा महिन्यांपासून येथील पंप बंद आहे. १९८७ सालापासून हे डीझेल पंप सुरू होते. जुनी मशीन बंद करून डिझेल कंपनीने नवीन मशीनदेखील येथे बसविली. मात्र कुठल्या कारणामुळे हा पंप बंद आहे, हे समजू शकले नाही. डिझेल याच आगारातून भरल्यास चालकांचा वेळ वाचतो. अमरावती डेपोत जाणे व येण्यासाठी लागणारा डिझेलचा अतिरिक्त आर्थिक बोझा एसटी महामंडळावर पडत आहे. अमरावती डेपोत त्या ठिकाणच्या बसेस व बडनेºयातील बसेसचा बोझा एकाच पंपावर पडतो आहे. अर्धा ते एक तास डिझेल भरण्यासाठी थांबावे लागत आहे. याचा मन:स्ताप वाढल्याची ओरड होत आहे. डिझेल भरण्याची सोय बडनेरा आगारातूनच केली जावी, अशी मागणी होत आहे.गाड्या धुणेही बंदबडनेरा एसटी आगारातील गाड्या स्वच्छ करणे काही महिन्यांपासून बंद आहे. पाणीपंप बंद आहे. प्रवासी उलटी करतात अशा बसेस जशाच्या तशाच येथून प्रवाशांच्या सेवेत धावत असल्याने प्रवासी वर्गात संताप व्यक्त होत आहे. एकीकडे शासन स्वच्छतेवर भर देत आहे. बडनेरा आगारात मात्र बसेस न धुताच प्रवाशांच्या सेवेत धावत असल्याचे हे अशोभनीय चित्र पहावयास मिळत आहे.