शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धामकचे प्रकल्पग्रस्त भूखंडापासून वंचित

By admin | Updated: April 23, 2016 00:12 IST

तब्बल १४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही धामक येथील प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असून ....

प्रतीक्षा व्यर्थ : अन्यायग्रस्तांनी धरली उपोषणाची कासमनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरतब्बल १४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही धामक येथील प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असून त्यासाठी प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सन २००२ मध्ये धामक मधील अर्ध्यागावाचा पुनर्वसनात समावेश करण्यात आला व त्यासाठी ५३ एकर जमीन संपादीत करण्यात आली व त्यामध्ये ४३ प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप करून ताबा पावती सुद्धा देण्यात आली परंतु इतर प्रकल्पग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे भुखंड मिळण्यासाठी ताटकळत रहावे लागत आहे. धामक गावात ५५१ कुटूंब वास्तव्यास असून त्यापैकी २१५ कुटुंबाचा पुनर्वसनात समावेश झाला आहे व उर्वरीत गावाचा पुनर्वसनात समावे करून धामक ‘मॉडेल गाव’ बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला. परंतू अद्यापपर्यंत संपूर्ण धामक गावाचे एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्यासंदर्भात शासन व प्रशासनाला अपयश आले आहे व त्याला कारणही तसेच आहे. बहुतांश प्रकल्पग्रस्तांची शेतजमीन नवीन पुनर्वसन परिसरात आहे त्यामुळे नवीन गावाठाणमध्ये भुखंडाचे वाटप व्हावे अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे तर काही प्रकल्पग्रस्तांनी बेलोरा गावठाण नजीक भुखंडाची मागणी केली आहे तर काही ठराविक प्रकल्पग्रस्तांनी येवती गावठाणला पसंती दर्शविली आहे. परंतु ज्या ठिकाणी बहुतांश प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. त्याच ठिकाणी भुखंडाचे वाटप व्हावे ही रास्त मागणी आहे व त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी ३-११-२०१५ व १५-२-२०१६ तसेच २२-२-२०१६ ला वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन दिले व त्यानंतर प्रशासनाने धामक येथील तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देवून (बचत भवन, अमरावती) येथे प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप करण्याचे ठरले. परंतू काही कळण्याअगोदरच या भूखंड वाटपाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे संयमाचा बांध तुटल्याने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी शासनाने कोट्यवधी खर्चून पुनर्वसन स्थापित केले. त्याच ठिकाणी भुखंड मिळण्यासाठी अर्ज केला आहे जर तात्काळ भुखंडाचे वाटप न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.