शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३६ हजार शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: November 10, 2015 00:29 IST

बलिप्रदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रदेलाच दिवाळीची उपमा आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़

सोयाबीन गेले : सावकारांनीही मदत नाकारलीधामणगाव रेल्वे : बलिप्रदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रदेलाच दिवाळीची उपमा आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़ पूर्व भागात केवळ एकरी एक पोतं सोयाबीन घरी आल्याने मागील वर्षाचे सावकाराचे मशागतीसाठी घेतलेले पीककर्ज परत करण्याची अवस्था शेतकऱ्याकडे नसल्यामुळे या सावकारांनी दिवाळीसाठी मदतही नाकारली आहे़जिल्ह्यात सर्वाधिक फटका यंदा खरीप हंगामात धामणगाव तालुक्याला बसला आहे़ अल्प पावसामुळे दरवर्षी एकरी ८ ते १० पोते सोयाबीन घेत असत. यंदा तर शेतातील सोयाबीन काढणे अवघड झाले आहे़ हार्वेस्टरने सोयाबीन काढल्यानंतर एका एकरात केवळ एक पोतं सोयाबीन निघाले. त्यामुळे हार्वेस्टरचा खर्च देणेही परवडनासे झाले असल्याची माहिती दिघी येथील अनुभवी शेतकरी अरूण महल्ले यांनी दिली़ एका एकराकरिता तब्बल १५ ते २० हजार खर्च सोयाबीनसाठी आला असताना एक किंवा दोन पोते सोयाबीन घरी आणल्यानंतर मागील वर्षाचे सावकरांचे कर्ज द्यावे की बँकेची परतफेड करावी किंवा दिवाळी साजरी करावी, असा प्रश्न महल्ले यांनी या भागातील शेतकऱ्यांच्यावतीने उपस्थित केला आहे़ चणा, गहू बियाणे मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा अल्प पावसामुळे घरात सोयाबीन आले नाही़ खरीप हंगाम हातातून गेला. आता रबी हंगामाकरिता शेतात प्रथम तणनाशक मारणे गरजेचे आहे़ तद्नंतर व्ही-पास व रोटावेटर फिरविण्याचा खर्च अधिक येतो़ एकरी ३० किलो हरभरा २ हजार रूपये, पेरणी दीड हजार, शेतीची मशागत २ हजार व खताचा खर्च असा ६ हजार रूपये एकरी खर्च येत असून गहू पिकासाठी यापेक्षा जास्त खर्च येतो. खरीप हंगामात हातात काहीच न आल्यामुळे गहू व चणा बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे़जुन्याच कपड्यावर करणार दिवाळी साजरी घरी दोन एकर शेती केवळ तीन पोते सोयाबीन घरी आले़ या पिकाने पूर्ण दगा दिला आहे़ दरवर्षी दिवाळीच्या आठ दिवसांपूर्वी मुलांसाठी कपडे खरेदी करण्याची घाई होती़ मोठा आनंद साजरा करण्यात येत होता़ परंतु यंदा निर्सगाच्या चक्रव्यूहामुळे हातात पीक आले नाही घरी फराळाचे सोडा साधा दिवाळीसाठी किराणा आणण्याची सोय नाही, दिवा कसा पेटवायचा याची चिंता आहे़ त्यामुळे यंदा काळजाच्या तुकड्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर साजरी करण्याची वेळ आली आहे़