शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

देवनाथ मठ-तीनशे वर्षांची गुरु परंपरा

By admin | Updated: August 2, 2015 00:32 IST

इ.स. १९४९-१६०० मधील पैठणच्या संत एकनाथानंतर त्यांचे परंपरेतील नित्यानंदनाथ, कृष्णनाथ, विश्वनाथ, मुऱ्हानाथ, रंगनाथ, गोपाळनाथ व देवनाथांचे गुरु...

अंजनगाव सुर्जी : इ.स. १९४९-१६०० मधील पैठणच्या संत एकनाथानंतर त्यांचे परंपरेतील नित्यानंदनाथ, कृष्णनाथ, विश्वनाथ, मुऱ्हानाथ, रंगनाथ, गोपाळनाथ व देवनाथांचे गुरु गोविंदनाथ या नाथ परंपरेतील संत देवनाथ यांचा जन्म इ.स. १७५४ साली सुर्जी येथे दत्त जयंतीचे आधीचे दिवशी झाला. त्यांचे वडील राजेश्वरपंत हे तत्कालीन निजामशाहीत सुर्जी परगण्याचे प्रतिनिधी होते. आपले गुरू गोविंदनाथ यांचेकडून नाथ परंपरेची दिशा घेऊन व आपले आयुष्य कथा कीर्तन करुन भ्रमंतीत घालविण्यावर देवनाथांनी सुर्जी येथील सध्याचे देवनाथ मठाच्या जागी श्रीनाथ सदन या नावाने गुरुघर उभे केले. नाथ परंपरेतील तपश्चर्या आणि व्रतस्थ जीवनशैली सोबतच या नाथपीठाने प्रखर राष्ट्रभक्तीचे धडे, जनसामान्यांना दिले. सोबलच हिंदू धर्म परंपरेचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. देवनाथनंतर या परंपरेत दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, गोविंदनाथ, मनोहरनाथ व सन २००० पासून जितेंद्रनाथ अशी समृध्द गुरुपरंपरा लाभली आहे. सुर्जी येथे मठ स्थापनेचे वेळी दिल्लीवर मोघल सम्राटाचे राज्य होते. हैद्राबादेत निजाम होता. म्हैसूरमध्ये हैदरअली व टिपू सुलतान होता. पुण्यात पेशवे, नागपुरात भोसले व अचलपुरात नबाबाचे राज्य होते. आपसातील कलहाचा गैरफायदा घेऊन याचवेळी इंग्रजांनी देशात पश्चिम बंगालमधून प्रवेश केला व येथील राज्यकर्त्यांसोबत तह करुन त्यांनी तैनात असलेल्या फौजेचा प्रयोग याचवेळी सुरू केला. अशा प्रतिकूल परिस्थितीत धर्मरक्षणाचे व धर्मप्रसाराचे महाकठीण कार्य नाथपीठाने जिवंत ठेवले. आपल्या भ्रमंतीत देवनाथ पुणे येथे दरबारी गेले असताना सवाई माधवराव पेशवे यांनी त्यांचे स्वागत करुन पुजेत त्यांना पेशवे दरबाराचे दोन तरुण रक्षक त्यांच्या मठाच्या रक्षणासाठी दिले होते. जगू-गणू नाव असलेले हे पराक्रमी रक्षक जातीने महार होते. मठावर लुटारु दरोडेखोरांचे आक्रमण झाले असताना हे वीर मठात शहीद झाले. म्हणूनच आजही देवनाथ मठात कुळाचाराच्या नात्याने जगू-गणूच्या समाधीला पूजेचा अग्रक्रम आहे. नाथ परंपरेतील हा मठ संपूर्ण देशभरातील भक्तांच्या भावना लाभलेला प्रसिध्द मठ असून यामुळे शहराच्या लौकिकात मोलाची भर पडली आहे.