शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

रिद्धपूर तिर्थक्षेत्राचा पर्यटनस्थळांचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

अखिल महानुभाव परिषदेची मागणी ! मोर्शी : महानुभावपंथांची काशी असलेले श्रीक्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार महानुभावपंथ धर्मगुरू ...

अखिल महानुभाव परिषदेची मागणी !

मोर्शी : महानुभावपंथांची काशी असलेले श्रीक्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार महानुभावपंथ धर्मगुरू श्री गोविंदप्रभू यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यासाठी थीम पार्क, तसेच श्री महानुभाव पंथांशी संबंधित विविध स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर व आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबरच, निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध वनांचा जिल्ह्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाची शक्यता आहे. त्या लक्षात घेऊनच प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देऊन रिद्धपूर तीर्थक्षेत्रात विविध ठिकाणी विकास आराखड्यातून कामे होत आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळानेही यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्या पाहिजेत. रिद्धपूर येथे विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारे उपक्रम राबवावेत. तेथील विविध स्थळांचा विकास साधताना तेथील तलावाचेही सौंदर्यीकरण करावे. आराखड्यातील निधीबरोबरच पर्यटन निधीही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी केली आहे.

रिद्धपूर तीर्थक्षेत्रकारिता भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे, रुपेश वाळके, नितीन लुंगे,सुधाकर कोठीकर, प्रदीप टेकाडे, विनोद लुंगे, आशिष वानखडे, सुरेश मडघे, विनोद कोहळे, बाबुराव कडू, गोपाल लुंगे, सुनील शेळके, राजेंद्र देशमुख यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आ देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.

महानुभावपंथाची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेसाठीचे महात्म्य स्थळ असलेल्या श्री रिद्धपूर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा राबविण्यात यावा, रिद्धपूर विकास आराखडा सर्वांगीण व सविस्तर झाला पाहिजे. वरूड- मोर्शी तालुक्यातील महानुभावपंथांच्या सर्व ठिकाणांचा विकास व्हावा, या हेतूने समग्र तपशिलासह आराखडा तयार करावा, परिसरातील तळे, नैसर्गिक उद्याने, मोकळ्या जागांचा विकास केल्यास पर्यटकांसाठी नानाविध आकर्षण स्थळे निर्माण होतील व पर्यटनाला चालना मिळेल, असे मत अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी मांडले.