शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र भुयारची तडीपारी म्हणजे राजकीय बळी !

By admin | Updated: November 6, 2016 00:16 IST

पं.स. टेंभूरखेडा गणाचे सदस्य तसेच युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरिता लढा दिला.

हा कुठला न्याय? : शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्यास ठरविले गावगुंडवरुड : पं.स. टेंभूरखेडा गणाचे सदस्य तसेच युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरिता लढा दिला. परंतु वारंवार आंदोलने केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने मी कायदा व सुव्यवस्थेला बाधक ठरू शकतो, मी गुंड प्रवृत्तीचे असल्याचे अहवालात नमूद केल्याने पोलीस प्रशासनाने मला तडीपार घोषित केले. मात्र शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलने करून न्याय मिळवून देणारा गावगुंड असेल तर गावात फिरणारे गुन्हेगार प्रतिष्ठित आहे का, असा प्रतिसवाल देवेंद्र भुयार यांनी पत्रकार परिषदेत केला. अखेर २ वर्षांकरिता तडीपारी म्हणजे राजकीय बळी असल्याची चचार् परिसरात आहे. शेतकऱ्यामध्ये तिव्र असंतोष निमाण केला जात आहे तर या तडीपारीचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. पंचायत समितीचे टेंभूरखेडा गणातून निवडून आलेले देवेंद्र भुयार यांनी संत्रा, कपाशीपासून तर कृषी मालाला भाव देणे, शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, म्हणून शासनाने मदत देणे आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता शासनाला वेठीस धरून आंदोलने मोर्चा काढले. परंतु पोलीस प्रशानाने गुन्हे दाखल करून तसा अहवाल उपविभागीय अधिकारी मोर्शीर् यांचेकडे सादर केला. तसा प्रस्ताव पाठवून शिफारस केली होती. यानुसार साक्षीदार तसेच जाब देणारे देवेंद्र भुयार यांचे बयाण नोंदवून उपविभागीय अधिकारी मोर्शी यांनी अमरावती जिल्ह्यातून २ वर्षांकरिता मुंबई पोलीस अधिनियमान्वये उपविभागीय दंडाधिकारी एम.ए.कडू यांनी केल्याचे आदेशपत्र ३ नोव्हेंबरला पाठविले. परंतु ही तडीपारी म्हणजे राजकीय बळी असल्याची चर्चा परिसरात आहे. शेतकऱ्यांसाठी लढणे गुन्हा आहे काय ? : भुयारमाझी राजकीय प्रगती अनेकांकडून पाहिली जात नव्हती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ९ वर्षांपाूसन लढा देत आहे. अंध, अपंगाच्या शस्त्रक्रिया करवून आणल्या. गोरगरिबांची सेवा हाच माझा धर्म राहिला. मात्र आंदोलने करीत असताना कुठेही शासकीय मालमत्तेचे नुकसान किंवा कुणाच्याही जिवीतास हानी पोहेचली नसताना मला शासनाने गावगुंड घोषित केले. शेतकऱ्याकरीता आदंोलने, मोर्चे काढून न्याय देण्याचा प्रयत्न करणे गुन्हा आहे काय, असा प्रतिप्रश्नदेखील देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला आहे.हिम्मत असेल तर हात लावा - खा. शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्यावर आकसाने राज्य शासनाच्यावतीने पोलीस खात्याव्दारे दोन वर्षांकरिता तडीपारीचे आदेश काढले. याचा मी व संघटनेच्यावतीने तीव्र निषेध करतो. भुयार हे जिल्ह्याबाहेर जाणार नाही. कुणाची खुमखुमी असेल तर त्यांच्या अंगाला हात लावून दाखवा, अशा शब्दांत प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिलेल्या संदेशात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा.सुरेश शेट्टी यांनी म्हटले आहे.