शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय क्रीडा संकुलात युवकावर काठ्यांनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:40 IST

विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंगळवारी भर दुपारी पाच ते सहा जणांनी एका तरुणावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने प्रचंड खळबळ उडाली. या मारहाणीनंतर २० वर्षीय तरुण जीव मुठीत घेऊन पळाला. घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. मात्र, या घटनेवरून विभागीय क्रीडा संकुलाच्या आतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपोलिसांना पाचारणयुवतीचे धाडसव्यायामासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हकाठीसह वाहन घुसविले संकुलात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंगळवारी भर दुपारी पाच ते सहा जणांनी एका तरुणावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने प्रचंड खळबळ उडाली. या मारहाणीनंतर २० वर्षीय तरुण जीव मुठीत घेऊन पळाला. घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. मात्र, या घटनेवरून विभागीय क्रीडा संकुलाच्या आतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.कला व वाणिज्य महाविद्यालयाचा २० वर्षीय विद्यार्थी मंगळवारी सायंकाळी विभागीय क्रीडा संकुलाच्या आवारात सरावासाठी आला. दरम्यान पाच ते सहा जणांनी त्या तरुणावर लाठ्या काठ्यांनी हल्ला चढविला. त्यामुळे सरावासाठी आलेल्या सर्वांचेच हल्लखोरांकडे लक्ष गेले. त्या विद्यार्थ्याची एक सहकारी मधस्थीसाठी गेल्यानंतर हल्लेखोर थोडे थांबले. यादरम्यान त्या विद्यार्थ्याने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती अनिल भुईभार यांनी गाडगेनगर पोलिसांना दिली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. हे प्रकरण गाडगेनगर पोलिसांत पोहोचल्यानंतर दोन्ही पक्षाने आपसी समझोता केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरात घडलेला हा गंभीर प्रकार अप्रिय घटनेला आमंत्रण देणारा ठरला आहे. विद्यार्थ्याने जीव मुठीत घेऊन पलायन केल्याने सुदैवान तो बचावल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.पालकही भेदरले; सुरक्षेसंबंधी उपाययोजनांची मागणीमुलांना व्यायामाची सवय लागावी, सोबत विरगुंळा म्हणून मुले खेळतील, या भावनेने अनेक पालक लहान मुलांना विभागीय क्रीडा संकुलावर आणतात. मात्र, हे वातावरण अचानक असुरक्षित झाल्याचे दिसते. स्टेडियमच्या आवारात घडलेल्या मंगळवारच्या घटनेमुळे पालकांमध्येही चांगलीच धडकी भरली आहे. जिल्हा स्टेडियम परिसरातील सुरक्षेची जबाबदारी विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्या अधिकारक्षेत्रात आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरक्षेसंबंधी उपाययोजना करायला हव्यात. क्रीडा संकुलाला दोन प्रवेशद्वार आहेत. एक खुले तर, एक बंद आहे. मात्र, बंद प्रवेशद्वारासमोरच टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. याशिवाय तरुणांचे जोडपे निवांतपणे रात्री उशिरादेखील बोलत बसलेले आढळते. अशातून हे गुंड प्रवृत्तीचे तरुण जिल्हा स्टेडीयमच्या आत शिरून मुक्त संचार करतात. मात्र, जिल्हा स्टेडियमची प्रशासकीय यंत्रणा कोणतीही दखल घेत नसल्याची ओरड नागरिकांनी सुरू केली आहे.अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी शंभर रुपयांच्या पासेस सुरू केल्या होत्या, जेणेकरून क्रीडा संकुलत कोण आले, कोण गेले, हे कळले असते. मात्र, उपक्रम बंद होताच अशा घटना घडायला सुरुवात झाली.- प्रतिभा देशमुख,क्रीडा उपसंचालक.