शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गुंजी टेकडी विकासापासून वंचित

By admin | Updated: August 15, 2015 00:48 IST

कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या सहवासात तब्बल एक तप राहिलेल्या संत चिंधे महाराज यांचे समाधीस्थळ गुंजी टेकडी अद्याप विकासापासून कोसो दूर आहे़

चिंधे महाराज समाधीस्थळ उपेक्षित : गाडगेबाबांचे सहकारी होते चिंधे महाराज धामणगाव रेल्वे : कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या सहवासात तब्बल एक तप राहिलेल्या संत चिंधे महाराज यांचे समाधीस्थळ गुंजी टेकडी अद्याप विकासापासून कोसो दूर आहे़संत चिंधे महाराजांनी वैभवशाली जीवनाला रामराम ठोकून सन १९३४ मध्ये ईश्वराच्या शोधात वयाच्या १६ व्या वर्षी गृहत्याग केला़ राज्यभर गावोगावी फिरून कीर्तन व प्रवचनाद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले़ अंधश्रध्देच्या जोखडात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ इयत्ता चौवथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संत चिंधे महाराजांनी कीर्तनातून समाजातील अनिष्ट चालीरितींवर प्रखर हल्ला चढविला. मंदिरापुढे देवाच्या नावाने शेकडो निष्पाप बोकडांचा बळी दिला जात असे़ त्यांनी पुढाकार घेऊन स्वत:च्या अमोघ वाणीने जागर केला. म्हसोला येथील बळी प्रथा कायमची बंद झाली़तालुक्यातील गव्हा फरकाडे येथे श्रमदानातून शाळा इमारत उभी केली. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली़ चांदूररेल्वे, कारंजा, बुलडाणा, पुसद या तालुक्यातील अनेक गावांत त्यांनी शाळा बांधल्या़ चिंधे महाराजांनी केलेल्या पाच हजार कीर्तनांमधून अंधश्रध्दा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे कार्य केले़ भजनमाला, समर्थांचे जीवनचरित्र व प्रार्थना, परमार्थ साधना, निष्काम भावनेतील सुविचारांचे तारे, संत गाडगे महाराजांचा नित्यपाठ, संत ज्ञानदर्शक भजनावली, ‘डेबू माझा लेकुरवाळा’ तसेच संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारी भजने त्यांनी लिहिली़ अनेक भजने संत गाडगेबाबा मिशन मुंबईद्वारा प्रकाशित मासिक व ध्वनीफितीतून प्रसारित करण्यात आली़ आधुनिक संत चिंधे महाराज यांनी जन्मभर अंधश्रध्दा दूर करण्याचे कार्य केले़ तालुक्यातील गुंजी येथे त्यांचे समाधीस्थळ असून हे समाधीस्थळ आजही उपेक्षित आहे़ शासन व प्रशासनाने समाधीस्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे़