शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

संसर्गजन्य आजारात डेंग्यूचाही दंश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST

अमरावती: वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे .सध्या या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या संसर्गजन्य ...

अमरावती: वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे .सध्या या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले असून रुग्णालय गर्दी होत असल्याचे दिसून येत आहेत. त्यात डासांची पैदास वाढल्याने डेंग्यू ,मलेरिया व चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसले.

सध्या वातावरणात सतत बदल होत आहेत. गत काही दिवस ढगाळ वातावरण आहे. तसेच दिवसभर ऊन आणि पहाटे थंडी जाणवत आहे. गत महिन्यात पावसाने कहर केला होता. त्यानंतर वातावरण बदलले पावसाने उघडीप दिली. दुपारी कडक उन पडल्यामुळे हवेत उष्णता निर्माण झाली. सध्या हे वातावरण पुन्हा बदलेले असून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळात वातावरणामध्ये उष्णता आणि कधीकधी गारठा जाणवत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे .सध्या अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे संसर्गजन्य आजारांनी ग्रासले आहे. वातावरणातील संसर्गामुळे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालय गर्दीने फुलली आहेत. किरकोळ दिसणार हे आजार बळावू नयेत म्हणून रुग्ण तातडीने उपचार घेत आहेत. बदलत्या वातावरणात डासांची पैदास वाढली असून डेंग्यू व अन्य आजाराला निमंत्रण मिळत आहे. आजघडीला जिल्ह्यात डेंग्यू,चिकणगुनिया,मलेरियाचे रूग्ण आढळून येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सुत्रांनी सांगितले.

बॉक्स

सल्ल्याशिवाय औषध नको!

सर्दी, ताप ,खोकला, अंगदुखी हे ग्रामीण भागात सर्रास होणारे आजार आहे .त्यामुळे या आजाराकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. अनेक वेळा अशा आजारांसाठी मेडीकल्स करून गोळ्या आणून त्याचे सेवन केले जाते.मात्र परस्पर गोळ्या घेणे हे दुसऱ्या आजाराला किंवा असलेले आजार बळावण्याची कारणीभूत ठरू शकते.

बॉक्स

कशी घेता येईल घरगुती दक्षता?

पाणी साठवण टाक्या नियमित स्वच्छ कराव्यात

घराच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी

झुडपे व नाशक गवत वाढल्याने ते काढून घ्यावे

घरात स्वच्छता ठेवावी कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावावी.

आजारी व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळावे.

कोट

घरातील साठवलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा ड्राय डे पाळावा. डेंग्यू व अन्य आजाराचे रूग्ण आढळून येत असल्याने आजाराची कुठलेही लक्षण दिसून आल्यास डॉक्टरराचा सल्ला घेवून उपचार घ्यावेत.

डॉ.रेवती साबळे

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी