शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात स्वच्छ व्यक्ती हाच लोकशाहीचा सन्मान

By admin | Updated: January 24, 2015 22:47 IST

देशासमोर युवकांची बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न ही मोठी समस्या उभी आहे. भष्ट्राचार या व्यवस्थेपासून सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींनी राजकारणात येणे

अमरावती : देशासमोर युवकांची बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न ही मोठी समस्या उभी आहे. भष्ट्राचार या व्यवस्थेपासून सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींनी राजकारणात येणे हाच खरा लोकशाहीचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन केंद्रिय रासायनिक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी येथे शनिवारी व्यक्त केले.येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित अभियांत्रीकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ‘तरंग’ तांत्रिकी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, आ. सुनील देशमुख, शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे, उद्योजक चित्तरंजन काजवडकर, माणिक ठोसरे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, प्राचार्य ए, बी. मराठे, सुरेश सावदेकर, श्रीकांत चेंडके, सुनील खराटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. अहिर यांनी हव्याप्र मंडळाचा गौरव करीत या संस्थेने खेडाळू घडविताना देशाला निरोगी युवक देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. येथील खेडाळू मोठ्या पदावर कार्यरत असून निरोगी देशभक्त घडविले आहेत. प्राचीन काळातही ऋषी, मुनी आणि गुरुदक्षिणा हा शिष्य, गुरुंची महिमा विषद करणारा ठरला. हीच परंपरा हव्याप्र मंडळाने जोपासली असून ती देशभक्तीसाठी पूरक असल्याचे ते म्हणाले. शिक्षण देणाऱ्या संस्थानाही विद्यार्थ्यांचे पुढे काय? ही चिंता कायम आहे. त्यामुळे येत्या काळात बेरोजगारी दूर करणारी तांत्रिक शिक्षण, नवीन धोरण सुरु करावे लागेल. सरकारपेक्षा संस्था शिक्षणासाठी मोठे काम करतात. रोजगार नसतानाही शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरुच आहे. त्यामुळे प्रगत तंत्रज्ञान, कुशल युवक कसा तयार होईल, याकडे भर दिला जाईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ हे स्वप्न बघितले आहे. त्याकरिता ग्रामीण युवक, शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट हे अभिनव उपक्रम राबविले जाणार आहे. बेरोजगारी सर्वच जाती धर्मात असून ती दूर करण्यासाठी नव्याने धोरण तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात काही चांगले करायचे असेल तर राजकारणात चांगल्या प्रतिमेच्या व्यक्ती आल्या पाहिजे, असे म्हणताना ना. अहिर यांनी इस्त्रोचे शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे यांना राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी रामदास तडस, सुनील देशमुख, नितीन घाटपांडे, प्रभाकराव वैद्य आदींनी मनोगत व्यक्त केले. लोकप्रतिनिधी, खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. संचालन मराठे तर आभार प्रदर्शन माधुरी चेंडके यांनी केले. (प्रतिनिधी)