अमरावती : वारंवार पाठपुरावा करुन ही महावितरणने वीजग्राहकांकडून अभियंत्याच्या मागण्यांकडे दुर्लुक्ष केल्याच्या निषधार्थ आज सोमवारी सबआर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. स्थानिक विद्युत भवनासमोर झालेल्या या आंदोलनात महावितरणचे शैकडो अभियंते उपस्थित होते. अचलपुर, अंजनगांव, तिवसा येथील अति उच्च दाब असलेली उपकेंद्र अतिभारीत झाल्यामुळे ग्रामीण जनतेला तसेच कृषि वीजग्राहकांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत आहे.त्यामुळे ग्राहक या प्रकाराला वैतागले आहेत. डीपी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. या करिता संघटनेकडून ताबडतोब उपाययोजना करण्याच्या विनंती करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंतही राज्य विद्युत वितरण कंपनीने प्रशासनाने संघटनेस चर्चेस न बोलावून दखलही घेतली नसल्याचा आरोप या अभियंत्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
वीज ग्राहकांसह अभियंत्यांच्या मागण्या ‘जैसे थे’
By admin | Updated: December 8, 2015 00:15 IST