शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

वेतन देयकांना विलंब; पाच कर्मचारी निलंबित

By admin | Updated: January 1, 2017 00:42 IST

शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत शिक्षकांचे नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे वेतन देयके विलंबाने सादर ..

सीईओंची कारवाई : वेतन देयके उशिरा सादर करणे भोवले अमरावती : शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत शिक्षकांचे नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे वेतन देयके विलंबाने सादर केल्याप्रकरणी मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दर्यापूर व चांदूररेल्वे पंचायत समिती मधील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ सहायकांचा समावेश आहे. यासंदर्भात शुक्रवार ३० डिसेंबर रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये दर्यापूर पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक राहुल प्राणकर, वरिष्ठ सहायक पी.एस. साखरे, वरिष्ठ सहायक व्ही. बी. देशमुख, तर चांदूररेल्वे पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अनिल राऊत व कनिष्ठ सहायक अरविंद चिंचमलातपूरे यांचा समावेश आहे. सीईओंच्या या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत पंचायत समिती स्तरावरून दर महिन्याच्या १४ तारखेपर्यंत वेतन देयके सादर करण्याबाबत सीईओंनी सर्व पंचायत समितींना लेखी सूचना दिल्या आहेत. यानुसार प्रत्येक पंचायत समितीचा आढावा प्रशासन प्रमुखांकडून घेण्यात येतो. जिल्ह्यातील १४ पंचायत समितींपैकी १२ पंचायत समितींनी शालार्थ प्रणालीनुसार माहे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन देयके एमटीआर ४४-बीडीएस २६ नोव्हेंबर रोजी काढल्याने वित्त विभागाला ते २८ नोव्हेंबरला प्राप्त झाले. त्यानुसार वित्त विभागाने सीईओंकडे वेतन देयके सादर केलीत.