शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बीजोत्पादन पुरवठय़ाचा बोजवारा

By admin | Updated: May 27, 2014 00:23 IST

राज्याचे खरीप पेरणीचे नियोजन व अंमलबजावणीच्या दृष्टीने पेरणी व उत्पादने उद्दिष्ट महत्त्वाचे मानले जाते. नेमक्या याच बाबीकडे यंदा कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

सुरेश सवळे - चांदूरबाजार

राज्याचे खरीप पेरणीचे नियोजन व अंमलबजावणीच्या दृष्टीने पेरणी व उत्पादने उद्दिष्ट महत्त्वाचे मानले जाते. नेमक्या याच बाबीकडे यंदा कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या गदारोळात खरिपासाठीच्या योजना केंद्राच्या मंजुरीसाठी अडकून पडल्या आहेत. सोयाबीन बिजोत्पादन व पुरवठय़ाचा बोजवारा उडाल्यानंतर घरचेच बियाणे पेरण्याचा आग्रह वगळता उर्वरित सर्व आघाड्यावर कृषी विभाग निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे. परिणामी यंदा बियाण्याच्या काळाबाजाराच्या माध्यमातून बियाणे विक्रेते शेतकर्‍यांना चांगलेच नाडवणार आहे.

मागील खरिपात सोयाबीन पक्वतेच्या काळातच अधिक पाऊस पडल्याने अनेक राज्यांत बीजोत्पादनाला फटका बसला. बियाण्यांची उपलब्धता व गुणवत्ता या दोन्हीत घट झाली. परिणामी राज्यात यंदा कमी प्रमाणात बियाण्यांची उपलब्धता होणार आहे. येत्या खरिपात सुमारे ३९ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज आहे. राज्यात सुमारे ५५ टक्के सोयाबीन क्षेत्रात नवीन बियाणे वापरले जाते. त्यानुसार यंदा सुमारे १४ लाख ६२ हजार टन बियाणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात खासगी व शासकीय कंपन्यांकडे एकूण ८ लाख ५९ हजार टन बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा मागणीच्या तुलनेत तब्बल सहा लाख टन नवीन बियाण्यांची तूट आहे.

राज्यात उपलब्ध असलेले सोयाबीनचे सर्व वाण हे सरळवाण आहेत. दरवर्षी नवीन बियाणे वापरण्याची आवश्यकता नसते. तीन वर्षांतून एकदा नवीन बियाणे वापरले तरी पुरेसे असते. संभाव्य बियाणे तुटवड्याच्या या पार्श्‍वभूमीवर यंदा शेतकर्‍यांनी नवीन बियाण्यांचा आग्रह न धरता स्वत: उत्पादित केलेले सोयाबीन वापरावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

दुसरीकडे राज्याचे खरीप नियोजन व अंमलबजावणीच्या दृष्टीने पेरणी व उत्पादने उद्दिष्ट महत्त्वाचे समजले जाते. नेमक्या याच बाबीकडे यंदा कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. खरीप नियोजनाच्या बैठकांबाबतही उदासीन अवस्था दिसून येत आहे. प्रत्यक्षात मे महिना संपत आला असतानाही अद्याप अनेक जिल्ह्यात नियोजनाच्या बैठका झाल्या नाहीत. या बैठका फक्त सोपस्कार म्हणून उरकण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांच्या हालचालीवरून दिसून येते. लोकसभा निवडणूक, आचारसंहिता, निवडणूक प्रक्रिया आणि पाठोपाठ सत्तापालट या सर्व गदारोळात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणार्‍या योजना व यंदा प्रस्तावित असलेल्या खरिपासाठीच्या बहुतेक योजना रखडल्या आहेत. एप्रिल व मे दोन्ही महिने त्या दृष्टीने गतिशून्य ठरले असून आता योजनेची मान्यता आणि पेरणी हंगामाची लगबग एकाच वेळी सुरू होण्याची शक्यता आहे.